सध्या आयपीएल चालू आहे. यात काही तरुण खेळाडू आपलं नाव भारतीय संघात घेण्यासाठी जीवाचं रान करून खेळताना दिसत आहेत. त्यातच एक आहे, मुंबई कडून खेळणारा सुर्यकुमार यादव.

सध्या त्याच्या खेळाची खूप चर्चा होत आहे. पण त्याच्या बाबत जरा दुखद गोष्ट घडली. ती नेमकं काय ? चला सविस्तर वाचून घेऊयात.

काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुनिल जोशी यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीच्या कारणामुळे रोहित शर्माला भारतीय संघात स्थान नाकारण्यात आलं.

रोहित शर्मा ला जाणून बुजून संघातून बाहेर काढलं आहे, अश्या अफवावी सोशल मीडियावर फिरत होत्या. पण अश्यातच सुर्यकुमार यादव बाबतही फार चर्चा होत होती.

सूर्यकुमार यादवकडे यंदाही निवड समितीने सरळ सरळ डोळेझाक केली आहे. स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आश्वासक खेळी करत असतानाही सूर्यकुमारला संधी मिळत नसल्यामुळे चाहते नाराज झाले होते.

त्यातच संघाची निवड झाल्यानंतर आणि स्वतःला स्थान न मिळाल्या नंतर सुद्धा सूर्यकुमारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करत निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानं दाखवून दिलं की आपण खेळाची कदर करत नाहीत.

सूर्यकुमारच्या या खेळीने प्रभावित झालेल्या रवी शास्त्रींनीही त्याला संयम ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी खास त्याच्यासाठी ट्विट करून संयम ठेव सगळं चांगलं होईल असं सांगितलं होतं. त्याला न निवडल्यांने रवी शास्त्री ही खूप नाराज असल्याचं स्पष्ट होतं.

एखाद्याने चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान का मिळत नाही ? यावर रवी शास्त्रींनी उत्तर दिलं. जे उत्तर खूप महत्त्वाचं आहे.

ते एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हणाले की “सध्या भारतीय संघात अनेक प्रतिभावान तरुण खेळाडू आहेत. ज्यांच्याकडे खूप उत्कृष्ट असा खेळ आहे. अशा परिस्थितीत ३० वर्षीय खेळाडूला संधी मिळणं कठीण आहे.

म्हणूनच मी तरुण खेळाडूंना संयम राखण्याचा सल्ला देतोय. सूर्यकुमार यादवप्रमाणे अजुन ३-४ खेळाडू आहेत की जे चांगली कामगिरी करत आहेत. पण ज्यावेळी तुमच्या सध्याच्या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा भरणा असतो अशावेळी इतर खेळाडूंना संधी देणं कठीण होऊन बसतं.”

पण मग विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सुर्यकुमार सारख्याना न्याय कधी मिळणार ?