मध्यंतरी एका मराठी सिनेमाच्या शूटिंग शुभारंभ करण्यासाठी चक्क राज साहेब ठाकरे आले होते. तेही पुण्याला. ज्या चित्रपट चं नाव आहे 8 दोन 75. तर आपण म्हणाल की आता त्याचं काय मध्येच तर झालं असं की त्याच्यात प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे.

तर तिचं काय अहो तिचे काही फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल झाले आहेत. इंस्टा ला गेले आणि तिचं अकाऊंट सर्च केलं तर अपल्याला पाहता येतील. तर तिच्या व्हायरल फोटो मागे नेमकं काय सत्य आहे चला जाणून घेऊयात.

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र यावेळी तिने विंटर लूकमधले फोटो शेअर करत सगळ्यांनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

संस्कृतीचे विंटर लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. या फोटोमध्ये संस्कृतीने फुल हँडचे स्वेटशर्ट परिधान केलं आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी केला आहे.

‘सांगतो ऐका’ या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.संस्कृती शेवटची ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे.

अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते. त्यामुळे तिने अपलोड केलेल्या फोटोवर तिला अनेक कॉमेंट्स येत आहेत. संस्कृती ही सध्या युथ मध्ये फार लोकप्रिय आहे. तर तिच्या विंटर लूक मधील व्हायरल झालेल्या फोटो मुळे पुन्हा प्रकाश झोतात आलेली आहे. नाहीतर तिचे सिनेमे येतच असतात. तर संस्कृती ला पुढील भावी वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.