ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो, बॉलिवूडमध्ये दृश्यममध्ये अजय देवगनच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका अभिनेत्री इशिता दत्ता हिने साकारली होती. आपल्या उत्तम अभिनयाने आणि अदाकारीने तिने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. इशिता इंस्टाग्रामवर नेहमी आपले हॉ’ट फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते.

तिच्या हॉ’ट आणि बो’ल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इशिता दत्ता अभिनेत्री तनुश्री दत्ताची छोटी बहिण आहे. इशिता दत्ता ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि कपिल शर्मासोबतच्या ‘फिरंगी’ चित्रपटाही झळकली होती. याशिवाय इशिताने ‘एक घर बनाऊंगा’, ‘बेपनाह प्यार है’ या मालिकेतून प्रकाश झोताता आली. ‘रिश्तों का सौदागर- बाजीगर’ आणि ‘झलक दिखला जा’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. परंतु, अल्पावधीतच तिला करिअरमधून ब्रेक मिळाला. यानंतर तिने अभिनेता वत्सल सेठसोबत विवाह बंधनात अडकली.

इशिता दत्ताने २८ नोव्हेंबर २०१७ मध्ये वत्सल सेठशी विवाह केला. वत्सल सेठ ‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आला होता. विशेष करून या विवाहाची कुठेच चर्चा होवू नये यासाठी दोघांकडूनही काळजी घेतली गेली होती. वत्सल सेठ हा इशितापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठा आहे. इशिता आणि वत्सल ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या मालिकेतमध्ये एकत्रित काम केलं होतं. तेव्हापासून ते एकमेंकांना डेट करत होते.

मिस इंडिया तनुश्री दत्ताची बहीण इशिताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या पहिल्याच मालिकेतून, प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करण्यात तिला यश मिळाले. त्यानंतर काही जाहिरातींमध्ये ती झळकत राहिली. २०१५ मध्ये बनलेल्या अजय देवगनच्या दृश्यम या सिनेमामधून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. या सिनेमामध्ये तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर साऊथमध्ये काही सिनेमे करुन तिने २०१७ मध्ये लग्न केले.

सुरुवातीच्या काळात म्हणजेच ९०च्या दशकात जस्ट मोहब्बत मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेने अक्षरशः छोट्यांपासून ते मोठ्यानं वेड लावले होते. एका छोट्या मुलाची, कॉलेजात जाण्यापर्यतची कथा त्यामध्ये दाखवण्यात आली होती. या मालिकेतील सर्वच पात्र चांगलेच लोकप्रिय देखील झाले होते. खास करून जय मल्होत्राचे पात्र तर सर्वांच्या खास पसंतीस उतरले होते. बॉलीवूडचा अभिनेता वत्सल शेठने ही भूमिका साकारली होती.

आपल्या पहिल्याच मालिकेमधून वत्सल शेठने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये आणि काही म्युझिक अल्बम मध्ये देखील काम केले होते. त्याने बऱ्याच सिनेमामध्ये देखील काम केले आहे. हाच वत्सल शेठ इशिताचा नवरा आहे. रीश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेत त्या दोघांनी सोबत काम केले होते.

याच मालिकेच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि वर्षाच्या आत दोघांनी लग्न सुद्धा केले. इशिता सध्या थोडा बादल थोडा पाणी या मालिकेतून प्रेक्षकांना भेटतेय, तर वत्सल शेठ प्रभासच्या आदिपुरुष या सिनेमात झळकणार आहे.