ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो!, ‘सैराट’ पाहून सैराट आणि झिंगाट न झालेला मराठमोळा माणूस या महाराष्ट्रात सापडणे दुरापास्त. नागराज मंजुळेच्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. हा चित्रपट जणू एक इतिहास झाला आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला नवा पायंडा घालून दिला.

देश-विदेशात हा चित्रपट मोठ्या प्रमाणत पाहिला गेला. परदेशात देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर देखील आपली मोहर उमटवली होती. या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु हीला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. त्यानंतर या चित्रपटाचा रिमेक देखील करण्यात आला होता. या चित्रपटात श्रीदेवीची मुलगी जानवी कपूर ही दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. सैराट चित्रपटानंतर आर्चीला चांगल्या चांगल्या ऑफर येऊ लागल्या होत्या. तसेच तिने काही चित्रपटात देखील काम केले.

सैराट चित्रपटात ती पंधरा वर्षाची होती आणि ती इयत्ता सातवीमध्ये होती. सातवीमध्ये असताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला एका कार्यक्रमात पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तिच्या वडीलाकडे म्हणजेच महादेव राजगुरू यांना रिंकूच्या चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर श्री. राजगुरू यांनी मंजुळे यांना होकार दिला होता. त्यानंतर सैराट चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले.

नुकताच एका कार्यक्रमांत आपल्या लाडक्‍या लेकीच्या आठवणीविषयी महादेव राजगुरू यांनी उजाळा दिला आहे. रिंकूचे वडील महादेव राजगुरु हे शिक्षक आहेत. तसेच रिंकूची आई देखील शिक्षिका आहे. रिंकूबाबत बोलताना महादेव राजगुरू म्हणाले की, मी आणि माझी पत्नी दोघेही नोकरी करतो.

त्यामुळे आम्हाला सहाजिकच लहानपणी रिंकूकडे लक्ष देता आले नाही. मात्र, रिंकू ही ध्येयवेडी आणि बोलकी आहे. तिने एखादी गोष्ट करायचे ठरवले की नक्कीच ते पूर्ण करते. रिंकूला नृत्याची देखील आवड आहे. एकदा लहानपणी मी तिला ऑर्केस्ट्रामध्ये घेऊन गेलो असता ती तडक उठून जाऊन थेट स्टेजवरच जाऊन नाचू लागली होती.

त्यानंतर तिला नृत्य करण्याची आवड निर्माण झाली. तसेच रिंकूचे आजोबा हे संगीत वाद्ये बनवत असत, त्यामुळे देखील तिला वाद्याचा देखील नाद लागला होता. रिंकू राजगुरु हिला एक छोटा भाऊ असून त्याचे नाव सिद्धार्थ आहे. आर्ची या पात्रामुळे आमच्या मुलीला ओळख मिळाली आणि रिंकुमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.

आम्ही आज काल कुठेही जातो तर आम्हाला म्हणतात की, हे रिंकू राजगुरुचे आई वडील आले. एक सर्वसामान्य मुलगी काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रिंकू. ती आमची मुलगी आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे, असेही ते म्हणाले. रिंकू ही खाण्यापिण्याची देखील शौकीन असून तिला नॉनव्हेज आवडत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.