मराठमोळी एक सुंदर गायिका. जिने “सारेगमप” या सिंगीग शो मधून अखंड महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य केले. अगदी बरोबर…. कार्तिकी गायकवाड हेच ते प्रसिद्ध नाव. ज्या नावानेच संपूर्ण मराठी जनतेला वेङ लावले. आपणां सर्वांची ही लाडकी कार्तिकी गायकवाड नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

मंजूळ स्वरांची ही स्वरसम्राज्ञी कार्तिकी गायकवाड हिचे रोनित पिसे सोबत लग्न झाले आहे. मराठी परंपरेनुसार कार्तिकीचा विवाहसोहळा छानप्रकारे थाटामाटात पार पडला. आपल्या लग्नात कार्तिकी लाल लेहंगा परिधान करून अतिशय सुंदर दिसत होती. जणू ती एखादी गोंडस राजकुमारी भासत होती.

या विवाह सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, सावनी रविंद्र हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनीही हजेरी लावली होती. तसेच प्राजक्ता गायकवाड ही या लग्नासाठी उपस्थित होती.

कार्तिकी गायकवाडचा नवरा हा पुण्याचा असून तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. इतकंच नव्हे, तर त्याचा स्वतःचा बिझनेस सुद्धा आहे. रोनित पिसे व कार्तिकी गायकवाड हे दोघेही एकमेकांना कित्येक वर्षांपासून खूप चांगले ओळखतात. रोनित च्या परिवारातील सर्व लोकांनी आपल्या मनमोहक कार्तिकीचे गाण्याचे अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत. लॉकङाऊनच्या काळातच त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती.

कार्तिकीचा 7 ङिसेंबरला मेहंदी व हळदी समारंभ पार पडला. तेव्हा तिने “पिस्ता” रंगाचा ङ्रेस घातला होता. 26 जून 2020 ला या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता आणि आता रोनित पिसे सोबत कार्तिकी गायकवाड ही विवाहबद्ध ही झाली आहे.

आपल्या महाराष्ट्राची ही आवडती गायिका कार्तिकी गायकवाड व रोनित पिसे यांना त्यांच्या सुखी व वैवाहिक जीवनासाठी स्टार मराठीतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.