ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

सध्या मराठी मालिकेत एक मालिका खूप आघाडीवर आहे. त्यातील पात्र आणि मालिका दोन्हीही फार लोकप्रिय झालेली आहे. घराघरात पोचली आहे.

कारण त्यातील विषय आणि आशय लोकांना आपलासा वाटतो. त्या मालिकेचं नाव आहे आई कुठे काय करते. होय, ही मालिका खूप आवडते सर्वाना.आता त्यात काम करणारी पात्र आपल्याला माहिती आहेत. पण त्यांचं खरं आयुष्य मात्र आपल्याला माहीत नाही. तर चला रजनी या पात्राचं खरं आयुष्य आपण जाणून घेऊयात.

स्टारप्रवाह ही वाहिनी टीआरपीच्या बाबतीत अग्रस्थानी असलेली पाहायला मिळत आहे वाहिनीच्या तब्बल पाच मालिकांना प्रेक्षकांनी पुरेपूर पसंती दर्शवली असून यात आई कुठे काय करते या मालिकेचाही समावेश आहे.

आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आता खूपच रंजक होताना दिसत आहे.

एकीकडे अभिला नोकरी लागल्याने अरुंधतीसह सर्वच कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे तर रजनी कारखाणीसची या मालिकेत नव्याने एन्ट्री झाल्याने मालिका अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे.गौरीची आई रजनी कंपनीची मालकीण असल्याने अनिरुद्धला आपली नोकरी टिकवण्यासाठी रजनीला कसे पटवणार ते येत्या काही भागातच पाहायला मिळेल.तूर्तास रजनी कारखानीसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री “सुषमा मुरुडकर” यांनी. सुषमा मुरुडकर यांनी या मालिकेअगोदर हिंदी मालिकेतून काम केले आहे.तर काही व्यावसायिक जाहिरातींमधूनही त्या झळकल्या आहेत. “इश्क में मरजावा २”,” कुंडली भाग्य ” या हिंदी मालिका तसेच ‘जागो ग्राहक जागो’ च्या जाहिरातीत देखील झळकल्या आहेत.याअगोदर एक टिकटॉक क्वीन म्हणून तिच्या व्हिडीओजना चांगलीच पसंती मिळाली होती. आई कुठे काय करते या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली असल्याने सुषमा मुरुडकर प्रकाशझोतात आल्या.रजन कारखानीसची दमदार भूमिका वाट्याला आल्याने त्या खूप खुश देखील आहेत. रजनी पात्राची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री यांना त्यांच्या पुढील भावी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.