एक मराठी मध्ये तरुण अभिनेत्री अशी आहे की तिच्यावर सगळेच फिदा आहेत. म्हणजे तिचं काम आणि सोशल मीडियावर असलेलं डेली पकाही न काही पोस्टिंग हे खुप व्हायरल होत आहेत.

ती सध्या लाखो दिलों की धडकन बनलेली आहे. तिचे खुप सारे चाहते आहेत. तर ती अभिनेत्री कोण ? तर रिंकू राजगुरू. आरची सैराट फेम.

नेमकं सध्या तिचे काही युनिक असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना फार आवडत आहेत. चला तर मगजाणुन घेऊयात की नेमकं घडलं तरी काय ?

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा होताना दिसते आहे. आता कॅप्शन आणि फोटो कोणते याची प्रचंड उत्सुकता आपल्याला लागलेली असेल. चला तर मग जाणून घेऊयात.

रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, आनंदी राहण्यासाठी मला कारण लागत नाही. हे तिचं वेगळेपण आहे. त्यामुळे ती सर्वात जास्त चर्चेत असते.

रिंकूने शेअर केलेल्या फोटोत निळ्या रंगाचा वन पीस घातला आहे आणि पायात स्पोर्ट शूज घातलेले दिसत आहेत. तिच्या या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. तिचं काम मराठी आणि हिंदीत खुप गाजत आहे.

या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. या चित्रपटाची शूटिंग लॉक डाऊन कडक असताना च लंडन ला जाऊन केलं होतं.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

रिंकू राजगुरू ही एक इतरांपेक्षा खूप हटके आणि वेगळी धमक असणारी अभिनेत्री आहे. तिने आल्या आल्या अनेकांची जिरवलेली आहे. तर अश्या हरहुन्नरी अभिनेत्रीला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप !….