काही कलाकार असे असतात की त्यांनी एकदा की करियर गाजवलं मग ते एकतर आयुष्यात पुढे यशस्वी होतात नाहीतर जागच्या जागी थांबली जातात. सध्या एक प्रसिद्ध मालिका थांबून बरीच वर्षे झाली असली तरी त्यातील काही कलाकार मंडळी अशी आहेत की ती मनातून जात नाहीत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती मालिका नेमकी कोणती ? अहो होणार सून मी त्या घरची.

किती गाजली होती ना. त्यात काम करणारी श्री आणि जान्हवी सगळेच व्हायरल झाले होते. त्यातच एक पात्र खूप लोकप्रिय झालं होतं. जे बाल म्हणून भूमिका करायचं. तर चला नग त्या बाल कलाकाराची सध्याची अवस्था जाणून घेऊयात.

२०१३ ते २०१६ या कालावधीत झी मराठी वाहिनीवर “होणार सून मी ह्या घरची” ही मालिका प्रसारित होत होती. मालिकेतील श्री आणि जान्हवीच्या जोडीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती . या मालिकेत “ओवी” चे पात्र दर्शवले गेले होते आपल्या निरागस अभिनयाने या चिमुरडीने साऱ्यांचीच मने जिंकून घेतली होती.

ओवीची भूमिका साकारणाऱ्या ह्या चिमुरडीला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही देण्यात आला होता. आज ओवी काय करते हे अनेकांना जाणून घेण्याची ईच्छा आहे चला तर मग जाणून घेऊयात याबाबत अधिक…कारण ओवी ने एवढ्या लहानपणी तिचे चाहते तयार केले होते. हे खुप मोठं काम आहे.

होणार सून मी ह्या घरची मालिकेत ओवीचे पात्र साकारले होते “क्रीतीना वर्तक” या बालकलाकाराने. क्रीतीना एक मॉडेल असून अनेक व्यावसायिक जाहिराती तसेच एक बालकलाकार म्हणून मराठी चित्रपट, मराठी- हिंदी मालिका तीने अभिनित केल्या आहेत.

शशांक केतकर सोबत झी युवा वरील इथेच टाका तंबू या आणखी एका मालिकेतून तिने काम केले होते. तर “कनिका”, “द शैडो” सारख्या भयपटात तीने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हिरवी हा आणखी एक मराठी चित्रपट तिने अभिनित केला आहे.

याशिवाय स्टार प्रवाहवरील गोठ (मालिकेतील बालपणीची राधा) , डर, गर्ल्स ऑन टॉप, सा’व’धा’न इं’डि’या, लक्ष्य, शपथ, जोधा अकबर अशा अनेक हिंदी मराठी मालिकेतून तीने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मालिकांसोबतच क्रीतीनाने बेटी बचाओ बेटी पढाओ कॅम्पेन, ताज ग्रुप, एस.बी.आय, विवा इलेकट्रोनिक शोरूम अशा अनेक ऍडसाठी काम केले आहे. काही जणांच्या कामाची लिस्ट एवढी प्रेरणादायी असते की कौतुकाचे शद्ब थांबतच नाहीत.

आपण जाणून थक्क व्हाल. म्हणजे तुम्हाला जाणून कौतुक वाटेल की क्रीतिनाने “पँटलुन ज्युनिअर फॅशन आयकॉन’ 15” स्पर्धेमध्ये पार्टीसिपेट केले होते. या स्पर्धेत ६०० स्पर्धकांमधून केवळ १०० मुलांची निवड करण्यात आली होती. या १०० मुलांमधून क्रीतीनाने पहिला क्रमांक पटकावला होता. तिच्या चाहत्यांना हेही तिचं काम खूप आवडलं.

एक बालकलाकार म्हणून क्रीतीनाला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. क्रीतीना सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील “जय जय स्वामी समर्थ” या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती चंदाची सावत्र बहीण म्हणून एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेनंतर साधारण ४ते ५ वर्षांनी ती या मालिकेत दिसत आहे. त्यामुळे कदाचित बहुतेकांनी तिला या मालिकेतून ओळखलेही असेन.

क्रीतिका वर्तक ही बालकलाकार अभिनय क्षेत्रात अशीच यशाची उंच शिखरे गाठत राहो हीच एक सदिच्छा…कारण सातत्याने काम केलं तर यश भेटत असतं. जे यश आता खूप गरजेचं आहे. त्यामुळे या बाल कलाकाराला त्याच्या पुढील भावी आयुष्याला उदंड लाख शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.