नुकतेच एका प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांनी लग्न करून चाहत्यांना खुश केलेलं आहे. लग्न म्हणजे दोन नात्यांचा विश्वास. तोच घेऊन हे जोडपं आता वैवाहिक जीवनाला सुरुवात करत आहे. ज्याचं नाव आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. जे सध्या लग्न करून ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.

सिध्दार्थ ने एका ठिकाणी दिलेला मुलखातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात त्याने अनेक उत्तरे दिलेली आहेत. नेमकं काय आहे प्रकरण चला बरं जाणून घेऊयात.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि प्रमाणिक कलाकार म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरकडे पाहिलं जातं. चेहऱ्यावरील हसू आणि कामातील प्रमाणिकपणा यांच्या जोरावर आज त्याचे असंख्य चाहते आहेत. अलिकडेच सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी सध्या चर्चेत आहे. सिद्धार्थने लग्नापूर्वी ‘दिल के करीब’ या सुलेखा तळवलकरांच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.

यावेळी बोलत असताना त्याने लग्नाविषयी आणि एकंदरीतच पर्सनल आणि प्रोफशनल लाइफविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याची ही मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. आणि तिथं त्याने जे काही खरे बोललेलं आहे, ते खूप व्हायरल रूप धारन करत आहे. कारण ग्लॅमरस दुनियेला हेच लागतं.

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थची ही मुलाखत चर्चेत येत असून सुलेखा तळवलकर यांनी सिद्धार्थला त्याच्या लग्नाविषयी काही प्रश्न विचारले. त्याचं उत्तर देताना त्याने आम्ही लिव्ह इनमध्ये होतो, पण लग्न होणार या विचाराने थोडं गडबडल्यासारखं होतंय, असं उत्तर दिलं.

मला ना खूप धडधड होतेय. म्हणजे आता झालं बॅचलर लाइफ संपली. बॅचरल लाइफचे थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता एक व्यक्ती लग्न करुन त्या घरी राहणारा आहे हे फिलिंग थोडं विचित्र आहे. म्हणजे यापूर्वी आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो.

दोन वर्ष आम्ही लिव्ह इनमध्ये होतो. खरं तर फरक फार काही पडणार नाहीये. फार तर फक्त घराचे पडदे बदलतील. बाकी काहीच फरक पडणार नाही. पण, ती फिलिंग आहे ना ती फार विचित्र आहे”, असं सिद्धार्थ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “लिव्ह इनमध्ये राहतोय आणि आता थेट नवरा-बायको होणार. यात जबाबदारी येते, नाती जुळतात, दोन कुटुंब एकत्र येतात. या जड शब्दांचंच खरं टेन्शन येतं. पण, आहे ही सगळी मज्जा सुद्धा आहे. आम्ही मिळून छान धम्माल करु.”

मिताली आणि सिद्धार्थ यांचं प्रेम प्रकरण शेवटी एकत्र आलेच. म्हणजे तसेही ते दोन वर्षे आधीपासूनच नवरा बायको सारखं राहत होते. फक्त आता ऑफिशली ते सर्वांच्या साक्षीने एकत्र आली आहेत. त्या दोघांना खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.