ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

सध्या ग्लॅमरस इंडस्ट्रीत एकतर कुणाचं लग्न होतय नायतर कुणाला मूल तरी होतय. म्हणजे काय झालं की या लॉ’क डा’ऊ’न मध्ये अनेकांनी वेळ योग्य पध्दतीने हाताळला असेच म्हणावे लागेल. कारण अनेकांनी आपल्या आयुष्यातील अनेक मोठ मोठे निर्णय यादिवशी घेतलेले आहेत. सध्या अनुष्का शर्मा नंतर डिलिव्हरी म्हणजे बाळ जन्माला घालायच्या बाबतीत करीना कपूर चा नंबर आहे.

सध्या तिला कितवा महिना चालू आहे आणि काय अवस्था झालीय हेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आता अभिनेत्री करीना कपूरही लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. करीनाचा नववा महिना सुरू आहे. त्यामुळे याच महिन्यात तिची प्रसूती होणार आहे. जसजशी डिलीव्हरीची तारीख जवळ येते आहे, तसतशी प्रत्येक महिलेची धाकधूक वाढते. करीना कपूरची या महिन्यात नेमकी कशी अवस्था होते आहे, ते तिनंच सांगितलं आहे.

करीना कपूरनं प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यातील आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं आपल्याला नेमकं काय वाटतं आहे, हे तिनं सांगितलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता करीनाच्या चेहऱ्यावरचा ग्लो कायम आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची चिं’ता नाही. उलट ती आनंदात, उत्साही आणि बिनधास्त दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करतानाही करीनानं कॅप्शन दिलं आहे. नववा महिना आणि अधिक स्ट्राँग होते आहे.

काही दिवसांपूर्वीच सैफ अली खाननं करीनाची जिलीव्हरी फेब्रुवारीत होईल असं सांगितलं होतं. तसंच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आपण दोघंही नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण दुसरं मूल ही मोठी जबाबदारी आहे. त्यासोबत थोडी भीतीही वाटते आहे, असंही तो म्हणाला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बाळानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या बाळाची उत्सुकता सर्वांना आहे. करीना प्रेग्नन्सीतही खूप अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरही ती आपले फोटो आणि व्हिडीओ सातत्यानं शेअर करत असते.

सध्या करीना कपूर आणि सैफ अली खान दोघेही नवीन पाहुण्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण मुलं म्हणजे देवघरची फुलं असतात. आता त्याच फुलांच्या सुंगधात गुंतायला जाण्यासाठी नवरा बायको वाट पाहत असतात. त्या दोघांना नव्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.