मित्रांनो!, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतल्या चुलबुली शेफालीची भूमिका अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. ५०० करोडचा नवरा मिळुदे म्हणत तिने या मालिकेत धमाल उडवून दिलीय. तर या अभिनेत्रीचे नाव आहे, काजल काटे. आणि आपल्याला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की या काजल काटेची सख्खी बहिण सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री. कोण आहे ती दुसरी काटे भगिनी? जाणून घेऊया.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे सारखे प्रसिद्ध चेहरे झळकत आहेत.सुरुवातीपासून मालिकेने रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. मालिका सुरु झाल्यापासून रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत. त्याचप्रमाणे डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’ मालिकासुद्धा झपाट्याने लोकप्रियतेच्‍या शिखरावर पोहोचली आहे आणि अल्‍पावधीतच प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरली आहे. मालिकेने हिंदीमध्ये पहिल्‍यांदाच भारताचे प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व कथा सादर करत भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत बहुतेक सर्वच मराठी कलाकारांना अभिनयाची संधी देण्यात आली आहे.

याच मालिकेत स्नेहा काटे शेलार या अभिनेत्रीने रामजींची दुसरी पत्नी जिजाबाईची भूमिका साकारत रसिकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेव्यतिरिक्त स्नेहा ही इतर मराठी मालिकेतही झळकली आहे. ‘स्वराज्यजननी जिजाबाई’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बाय बाय बायको’, ‘गर्ल्स हॉस्टेल’, ‘दुनियादारी फिल्मी इश्टाईल’ अशा अनेक मालिका तसेच नाटकांमधून तिच्या भूमिकांना रसिकांनी पसंती दिली होती. आणखी एक महत्वाचे म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेतील दौलत म्हणजेच अभिनेता “ऋषिकेश शेलार ” हा स्नेहाचा नवरा आहे.

मराठी मालिका इंडस्ट्रीत स्नेहा आणि काजल या तिची दोन्ही बहिणींनीनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. काजल काटे आणि स्नेहा या दोघी बहिणी मूळच्या नागपूरच्या. त्यांचे वडील “अशोक काटे” हे पोलीस निरीक्षक होते, मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणारी काजल चांगलाच धुमाकुळ उडवून देत असल्याचे पाहायला मिळते आहे. दोन्ही बहिणींना कॉलेजमध्ये शिकत असतानाच अभिनयाची आवड निर्माण झाली होती. हळूहळू दोघांनी अभिनयाला सुरुवात केली आणि आज दोघी बहिण इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाल्या आहेत.

अभिनयाप्रमाणे सौंदर्यावरही रसिक फिदा होतात. दोघी तितक्याच सुंदर दिसतात. ऑनस्क्रीन लूक प्रमाणे त्यांचे ऑफस्क्रीन लूकलाही प्रचंड पसंती मिळते. सोशल मीडियावरही त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला त्यांचे विविध अंदाज पाहायला मिळतील. त्यांचा प्रत्येक अंदाज त्यांच्या चाहत्यांसाठी खास असतो.