सध्या मराठी मालिकांमध्ये एका नवीन मालिकेचे प्रोमो फार चर्चेत आहे. त्यात एक आगळी वेगळी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे, असं दिसून येत आहे. म्हणजे कदाचित याआधी असा विषय मालिकेत आलेला नसेल, बहुतेक.

झी मराठी वाहिनीवर ही मालिका येणार आहे. सध्या कोविड ची काळजी घेऊन नव्या मालिका निर्मिती करणं झपाट्याने वाढत आहे. त्यात झी मराठी नेहमीच अग्रेसर असतं. या नव्या मालिकेचं लेखन तेजपाल वाघ करणार आहे. होय लागीर झालं जी या प्रचंड लोकप्रिय झालेल्या मालिकेचं लेखन करणारा लेखक.

ज्यात निखील चव्हाण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. निखील चव्हाण ला आपण लागीर झालं जी मध्ये फौजी च्या भूमिकेत तर पहिलच असेल. त्या मालिकेत तो फार लोकप्रिय झाला होता. आपल्याला आता मालिकेची खूप उत्सुकता लागली असेल. तर चला मग त्या मालिकेचं नाव जाणुन घेऊयात.

झी मराठीवर “ कारभारी लईभारी ” ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा पहिला प्रोमो प्रेक्षकांना फार आवडला होता. त्यात निखील चव्हाण एका राजकीय सभेत भाषण देताना दिसला होता. दुसऱ्या प्रोमोत तर तो एका मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालेलला असताना निर्णय बदलून आपल्या प्रेयसीला भेटायला निघतो.

त्यात तो रस्त्याची अडचण आल्याने प्रेयसीला घोड्यावर भेटायला येतो. असा नव्या मालिकेचा नवा काहीतरी वेगळं सूचित करणारा प्रोमो आहे. त्यात प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे, अनुष्का सरकटे. ती मुळची औरंगाबादची.

पण तिला लहानपणीपासूनचं अभिनय करण्याची प्रचंड आवड होती. मग हीच आवड तिला आज प्रसिद्ध अभिनेत्री पर्यंत घेऊन आली. याआधी ती कलर्स मराठीवर लक्ष्मी नारयण या मालिकेत लक्ष्मीची भूमिका करताना दिसली होती. लक्ष्मी म्हणून घराघरात पोहचलेली अनुष्का आता एका राजकारण्याची प्रेयसी म्हणून पडद्यावर येणार आहे.

ही मालिका राजकरणावर आधारित आहे; पण यात एक वेगळ्या रीतीने राजकारणातलं प्रेम ही दाखवण्यात येणार आहे. पुढील महिन्यात मालिका आपल्या भेटीला येणार आहे. तो पर्यंत आपण सगळेच वाट पाहू. अनुष्का आणि संपूर्ण टीम ला अमुक तमुक खूप शुभेच्छा !..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.