मित्रांनो!, बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याचे वडील, सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राकेश रोशन यांचा आज वाढदिवस. राकेश रोशन यांनी अनेक चित्रपटांत काम केले. पण ते काही ‘सुपरस्टार’ बनू शकले नाहीत. मात्र राकेश रोशन हे सातत्याने काम करत राहिले.

अगदी सहनायकाची भूमिका असो किंवा एखाद्या नायिकाप्रधान चित्रपटातील नायकाची भूमिका असो. बॉलीवूड मध्ये अभिनेता म्हणून राकेश रोशन यांच्या वाट्याला फार मोठे यश आले नाही. पण उत्कृष्ट दिग्दर्शक बनून त्यांनी ही कसर भरुन काढली. कोयला, करण अर्जुन, कोई मिल गया, कहो ना प्यार है असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत.

मस्तकावर विपुल केशसंभार असूनही राकेश रोशन हे सदैव टक्कल का ठेवतात असा प्रश्नं आपल्या सर्व रसिकांना पडला असेलच. तर मित्रांनो!, यामागे एक अतिशय रंजक किस्सा आहे. १९८७ मध्ये राकेश यांनी ‘खुदगर्ज’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी राकेश यांनी तिरूपती बालाजीला नवस बोलला होता. हा चित्रपट हिट झाला तर माझे केस देवाला अपर्ण करेल.

‘खुदगर्ज’ चित्रपट हिट झाला परंतू, गडबडीत राकेश रोशन मात्र हा नवस विसरले. यानंतर पत्नी पिंकीने त्याना या नवसाची आठवणही करून दिली. याच दरम्यान राकेश रोशन ‘खून भरी मांग’ हा सिनेमा बनवत होते. हा चित्रपटही हिट झाला आणि यानंतर राकेश रोशन यांनी आपला नवस फेडला. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांचे नाव ‘क’ या आद्याक्षराने सुरु होतात. याचे कारण म्हणजे ‘k’ हे अक्षर ते स्वत:साठी लकी मानतात.

सन २००० मध्ये त्यांच्यावर अली बुदेश टोळीकडून जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने डाव्या हाताला एक गोळी लागली होती आणि एक छातीला घासून गेली होती. राकेश रोशन जमिनीवर पडल्यामुळे हल्लेखोर पळून गेले होते आणि त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटाच्या नफ्यामध्ये भागीदारी हवी असल्यामुळे बुदेश टोळीकडून हा हल्ला झाला होता.

गतवर्षी जानेवारीत राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्यावेळी ते क्रिश ४ चित्रपटाच्या कामात खूप बिझी होते. राकेश रोशन यांच्या गळ्यात Squamous Cell Carcinoma चा त्रास होता. त्यांना कर्करोगाची नुकतीच सुरूवात झाली असली तरी त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रोजेक्ट्सचं काम थांबवावं लागलं. त्यामुळे त्यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या प्रदर्शन पुढे ढकललं.

राकेश रोशन यांनी कॅन्सरची सर्जरी केली. सर्जरी यशस्वी झाल्यानंतर ते आरामासाठी ब्रेकवर होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश रोशन यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या स्क्रीप्टवर पुन्हा काम सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार क्रिश ४ चित्रपट आधीच्या भागांपेक्षा जास्त दमदार असणार आहे. क्रिश ४ मध्ये स्ट्रगल आणि खलनायक जास्त पहायला मिळणार आहे.

आमच्या स्टार मराठीच्या टीम तर्फे श्री. राकेश रोशन यांना हार्दिक शुभेच्छा!!!