सध्या अनेक अभिनेत्री या लॉक डाउन मुळे आपापल्या घरी आहेत. आणि सोशल मीडियावर कार्यरत आहेत. काही सोशल मीडियावर बाय बाय करून पुन्हा पदार्पण करत आहेत. पण येताना डायरेक्ट सगळं आयुष्य बदलत आहेत.

म्हणजे काय तर एक अभिनेत्री आहे प्रसिद्ध. जिने काही फोटो तेही बाथरूम मधले सोशल मीडियावर टाकलेले आहेत. जेकी खूप व्हायरल होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ती खूप फिट आणि स्लिम त्यात झालेली आहे. तर चला मग ती अभिनेत्री आणि तिचे फोटो जाणून घेऊयात.

श्वेता तिवारी हे त्या अभिनेत्री चं नाव आहे. जिने हा सगळा बदल वर्क आउट करून घडून आणलेला आहे.

काय झालं होतं मागच्या काही दिवसांपासून तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. तिनं मागच्या काही काळात बरंच वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या फ्लॅट आणि टोन्ड अॅब्सचे फोटो शेअर केले होते. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. कारण तिचे खूप चाहते आहेत. ते कॉमेंट आणि शेयर ही खूप करतात.

व्हायरल झालं त्यानंतर आता श्वेतानं एक नवा बाथरुम सेल्फी शेअर केला ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आणि लोकांना म्हणजेच तिच्या चाहत्यांना तिचा हा नवा फिट आणि हिट अंदाज खूप आवडतं आहे. खूप कॉमेंट ही येत आहेत.

श्वेतानं नुकताच एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत तिचा फिटनेस गोल काय आहे आणि ती एका वेळी किती वजन कमी करते हे सुद्धा सांगितलं आहे. या फोटोवर श्वेतानं लिहिलं, ‘माझ्याकडे कोणतीही डेडलाइन नाही, मला फक्त एका वेळी एक पाऊंड वजन कमी करायचं आहे आणि मी तिथे पोहोचणार आहे.’

काही काळापूर्वीच श्वेता तिवारीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यात तिचे किलर अॅब्स दिसत होते. वयाच्या ४० वर्षीय श्वेता तिवारीचा फिटनेस पाहून सर्वच हैराण झाले होते. चाहत्यांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे की, श्वेतानं हे ट्रान्सफॉर्मेशन कसं काय केलं आहे. श्वेतानं जवळपास १० किलो वजन कमी केलं होतं. नॉट जोक. पण ठरवलं की सगळं शक्य आहे. असं श्वेता सांगते. तर तिचं ही बरोबर आहेच.

तिच्या या पोस्टवर चाहतेही तिचं कौतुक करत आहेत. आणि ते करणं ही योग्य आहे.कारण श्वेता ही एक प्रामाणिक पणे काम करणारी अभिनेत्री आहे. येणाऱ्या काळात अधिक चांगलं काम कसं करता येईल याकडे तिचं लक्ष असतं. इंडस्ट्री मध्ये एवढ्या कामाशी काम ठेवणाऱ्या खूप कमी तुरळक अभिनेत्री आहेत. त्यात ही एक.

श्वेता आता तिच्या येणाऱ्या काही नव्या चित्रपट आणि त्या पात्राच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे तिला आता जो वेळ मिळाला आहे त्याचा ती वापर करत आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.