काजोल हि ९० च्या दशकातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चित्रपट सृष्टीला खूप ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले आहेत. अभिनेत्री काजोलचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ मध्ये मुंबई येथे झाला.

काजोल ने अभिनय क्षेत्रात ‘बेखुदी’ या चित्रपटातुन पदार्पण केले, परंतु हा चित्रपट फारसा लोकांना आवडला नाही. त्यानंतर काजोल ने ‘बाझीगर’ या चित्रपटात काम केले आणि काजोल चा हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला.

त्यानंतर काजोल आणि शाहरुख खान यांचा ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता आणि या चित्रपटामुळे काजोल आणि शाहरुख खान या जोडीला खूप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली होती. ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाच्या यशानंतर काजोल आणि शाहरुख खान यांच्या जोडीने एकत्र खूप चित्रपट केले.

काजोल आणि शाहरुख खान यांच्या या जोडीने कुछ कुछ होता है , कभी कुशी कभी ग’म या चित्रपटांमध्ये काम केले आणि हे चित्रपट देखील खूप सुपरहिट झाले. आता काही वर्षांपूर्वी काजोल आणि शाहरुख खान यांनी ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘दिलवाले’ या चित्रपटामध्ये खूप वर्षांनंतर एकत्र काम केले. या चित्रपटाला देखील प्रेक्षाकांनी खूप प्रतिसाद दिला.

काजोल तिच्या विधानांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि काजोलची मुलगी न्यासा यांच्याबद्दल काजोल अस काही म्हणते की किंग खान म्हणजेच शाहरुख खानलाही ध’क्का बसला आहे.

हा वायरल होणार व्हिडिओ करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा आहे. कारणच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये करण नेहमीच बॉलिवूड मधील कलाकारांना निमंत्रित करत असतो, आणि त्यांना गमतीदार प्रश्न विचारात असतो. या विडिओ मध्ये देखील असे दिसत आहे कि, करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये काजोल, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी आले होते.

या कार्य क्रमात करणने काजोलला तिची मुलगी न्यासा आणि शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन या दोघांबाबत एक प्रश्न विचारला होता. यावर काजोल ने काय उत्तर ते उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य होईल.

अजय देवगण आणि काजोल यांच्या मुलीचे नाव न्यासा आहे. न्यासाच्या जन्म २००३ मध्ये झाला होता. आता ती १७ वर्षांची आहे. तुम्हाला माहीतच असेल कि काजोल आणि अजय देवगन यांची मुलगी न्यासा आता तिचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी सिंगापूरला गेली आहे. न्यासासोबत तिची आई काजोल देखील सिंगापुरला गेली आहे, तर अजय देवगण त्यांचा मुलगा युग सोबत मुंबईतच आहे. न्यासाने आताच १० वी ची परीक्षा दिली आहे आणि ती पुढचे शिक्षण घेण्यासाठी सिंगापुर ला गेली आहे.

तर शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याचा जन्म १९९७ मध्ये झाला. आर्यन आता २२ वर्षांचा आहे. आर्यन ने आता नुकतेच ‘द लायन किंग’ मध्ये अभिनय केले आहे.

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल कि कॉफी विथ करण या कार्यक्रमात करण काजोलला प्रश्न विचारतो की, जर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि काजोलची मुलगी न्यासा आतापासून दहा वर्षांनंतर पळून गेला तर काजोल आणि शाहरुख खान यांची प्रतिक्रिया काय असेल?

करणच्या या प्रश्नावर काजोल उत्तर देते कि, ‘दिलवाले दुल्हा ले जायेंगे’ काजोलच्या या वक्तव्यामुळे शाहरुख खान जरा गोंधळला आणि तो म्हणतो, मला विनोद समजत नाहीये.

नंतर ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात काजोलच्या विधानावर बोलताना शाहरुख खान म्हणतो कि त्याला भीती वाटते की जर काजोल त्याची नातेवाईक झाली तर… तो या नात्याचा विचारही करू शकत नाही. शाहरुखची हि प्रतिक्रिया ऐकून या कार्यक्रमात उपस्तिथ असलेल्या काजोल आणि राणी मुखर्जी दोघेही हसायला सुरु झाल्या.

काजोल ने कन्या दिवसाच्या दिवशी तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला होता आणि हा फोटो शेअर करताना काजोलने कॅपशन मध्ये तिची मुलगी न्यासासाठी लिहिले होते कि, ‘माझ्या प्रिय मुली, मला तुझ्यातील एक गोष्ट खूप आवडते आणि ती म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन नेहमीच माझ्यापेक्षा थोडा वेगळा असते आणि हा द्रीष्टीकोन मला स्वत:ला आणि बाकी सर्व गोष्टींना पूर्णपणे वेगळ्या प्रकारे दर्शवतो आणि असे करणे माझ्यासाठी खूप अ’वघड आहे’. काजोलने असेही सांगितले की तिने हा शेअर केलेला फोटो न्यासानेच क्लिक केलेला आहे’.

काजोल शेवटी ‘तन्हाजी’ या चित्रपटात अजय देवगणं सोबत दिसली होती. या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. सध्या काजोलने आगामी प्रकल्पांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.