चंकी पांडे या कोणतीही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला कोण नसेल ओळखत. खूप जुना असा अभिनेता आहे, जो खूप लोकप्रिय आहे. त्याने अनेक हिरो हिरोईन यांच्या सोबत काम केलेलं आहे. पण आता आपल्याला त्याच्या मुलीबद्दल बोलायचं आहे. जिचं नाव आहे, अनन्या पांडे.

आता तिचं काय तर ती सध्या कपडे घातले म्हणून चर्चेत आहे. म्हणजे जरा वेगळे घातले म्हणून. तिने फिरायला समुद्राच्या पाण्यात किंवा इतर जिथं ती गेली तिथले इंस्टा वर काही फोटो पोस्ट केले. ज्यात तिच्या ड्रेस ची किंमत काय ? याचीच चर्चा होत आहे. आता आपण जाणून घेऊ की किंमत किती ? आणि प्रकरण काय ?…

बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या अभिनयासोबत लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. यात दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर यासारख्या अभिनेत्रींच्या महागड्या बॅग्स आणि कपड्यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. यामध्येच आता सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडेची.

अलिकडेच अनन्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालदीवला गेली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनन्या अभिनेता इशान खट्टरसोबत मालदीवला गेली होती. या ट्रीपमधील अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील तिच्या एका ड्रेसच्या किंमतीची चर्चा रंगली आहे.

अनन्याने या ट्रीपमध्ये यल्लो आणि रेड रंगाचा एक वनपीस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती अत्यंत कूल लूकमध्ये दिसत होती. विशेष म्हणजे हा ड्रेस महागडा वाटत असला तरीदेखील त्याची किंमत अत्यंत कमी आहे. या ड्रेसची किंमत जवळपास ८ हजार ७७३ रुपये असल्याचं सांगण्यात येतं.

याच दरम्यान, ‘स्टुटंड ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्याचसोबत तिने इशान खट्टरसोबत ‘खाली पीली’ या चित्रपटातही काम केलं आहे. अनन्या अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते.

अनन्या पांडे ही खूप तरुण अभिनेत्री आहे. ती काम ही उत्तम करत आहे. आणि भविष्यात ती खूप पुढे जाईल अशी आशा चाहत्यांना वाटत आहे. तर तिला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.