सध्या मराठी मालिका आई माझी काळूबाई ही खुप चर्चेत आहे. कारण त्यामधील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे मालिकेच्या सर्वांनाच खूप त्रास झालेला आहे.

अश्यात निर्मात्यांनी प्राजक्ता गायकवाड ला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. पण मग आता तिची भूमिका कोण करणार ? हा सर्वांत मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. हे सगळं प्रकरण आहे तरी काय ? चला हेच जाणून घेऊयात.

लॉकडाऊननंतर नव्या मालिका सुरु झाल्या. काहींनी काळजी घेतली तर काहींनी घेतली नाही. तिथे कोरोना बाधित सापडले आणि मग त्या थांबवल्या गेल्या.

पण अश्यात काही मराठी मालिका कोरोना काळात काळजी घेऊन घराघरांत असलेल्या प्रेक्षकांना मनोरंजनाचा नवा खजिना खुला करून सुरू झाल्या.

नव्या मालिका येत असल्या तरी या सगळ्या नव्या मालिकावाल्यांना न्यू नॉर्मलला सामोरं जावं लागलं. अनेक नव्या मालिका आल्या त्यात होती ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका.

या मालिकेला कोरोनाकाळात अनेक अडचणींचा समना करावा लागला. याच सेटवर कोरोनाही पसरला होता. त्यात जेष्ठ अभिनेत्री आशाताई यांची कोरोना मुळे प्राण ज्योज ही मावळली.

पण आता आणखी एक मोठा बदल मालिकेत होत आहे. तो म्हणजेच या मालिकेत आर्या साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडची जागा आता ‘बिग बॉस 2’ फेम अभिनेत्री वीणा जगताप घेत आहे.

अचानकपणे प्राजक्ताने मालिका सोडण्यालाही वादाची किनार आहे. सध्या हा वाद सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे. त्यात अलका कुबल यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत तर प्राजक्ता गायकवाड वर वर्तणुकीचे गंभीर आरोप केलेले आहेत.

आता प्रश्न हा उद्धभवत आहे की मालिका कितपत आता चालू शकेल. एक अभिनेत्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली होती. जिचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेत काम केल्यामुळे आधीच खूप चाहते होते ती सोडून गेल्यावर काय होईल ? तर टीआरपी काही काळासाठी तरी घसरू शकेल नाहीतर वीणा जगताप यांनी जर भूमिकेत जीव ओतला तर फायदा ही होईल.

पण बाकी काहीही का होईना अचानकपणे मालिका सोडुन दिल्याने निर्मात्यांना जबर फटका बसलेला आहे. काही जण प्राजक्ता गायकवाड चं समर्थन करत आहेत. तर काही टीकाही करत आहेत.