Neha Kakkar Himash Kohli

अभिनेता हिमांश कोहलीचा जन्म 3 नोव्हेंबर 1989 रोजी दिल्ली येथे झाला होता. आज त्याचा वाढदिवस आहे. आपल्या छोट्या कारकीर्दीत हिमांश कामापेक्षा जास्त प्रेम प्रकरणामध्येच चर्चेत होता.

त्याचे नेहा कक्करशी असलेले संबंध आणि नंतर ब्रेकअपमुळे त्यांचं नाव फार चर्चेत आलं होतं.  हिमांश कोहली आतापर्यंत बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यात मात्र खूप अपयशी ठरला आहे.

हिमांश कोहलीचा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला होता. टीव्हीवर येण्यापूर्वी तो रेडिओ जॉकी होता. चॅनल ‘वी’ च्या रोजच्या ‘हम है है लाइफ’ च्या माध्यमातून हिमांशने टीव्हीवर पदार्पण केले होते. सुमारे 10 महिने तो शोचा एक भाग बनला होता. पण बॉलिवूड मध्ये त्याला फार काही चांगलं काम करता आलं नाही.

दिग्दर्शक दिव्या कुमारने त्याला तिच्या ‘यारियां’ चित्रपटात संधी दिली होती. या चित्रपटात हिमांश कोहली मुख्य भूमिकेत दिसला होता. जरी हा चित्रपट पडद्यावर आला असला तरी काही खास करू शकला नाही. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नंतर हिमांशला पुन्हा एकदा 2017 मध्ये बॉलिवूडमध्ये संधी मिळाली होती.

2017 मध्ये त्याचे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते. हिमांशने ‘ जीना इसी का नाम है’, ‘स्वीटी वेड्स एनआरआई’, ‘रांची डायरी’ और ‘दिल जो ना कह सका’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण नशिबानेही त्याला यामध्ये ही काही खास करता आलं नाही.

हिमांश कोहलीच्या आणि नेहा कक्कर यांच्या अफेअरबाबत इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. ‘इंडियन आयडॉल’ या टेलीव्हिजन शोमध्ये नेहा आणि हिमांशने एकमेकांवर खूप प्रेमही केलं होतं. नेहा आणि हिमांशाने बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट केलं. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांशी बरेच फोटोही शेअर केले.

अचानक एक दिवस दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आणि सगळी फोटो ही डिलीट केली. त्यानंतर नेहा अनेक स्टेज शो दरम्यान रडताना दिसली. ब्रेकअपनंतर नेहा पूर्णपणे ब्रेक झाली होती. अनेक रियालिटी शो दरम्यान नेहा ओरडली, रडली.

त्याचवेळी त्याचे अनेक लाइफ कॉन्सर्ट व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते, ज्यात तोही रडतानाही दिसला. जरी हिमांश या विषयावर फारसे बोलत नाही, परंतु यामुळे त्याचं ही मन खूप दुखावलं होतं हेही तितकंच खरं आहे.