हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, ज्याची प्रकरणं फक्त भारतातच नव्हे तर जगभर वाढतच चाललेले आहेत. काही वर्षांपूर्वीपूर्वी, हृदयरोग हा बर्‍याचदा ज्येष्ठांशी संबंधितचं होता; पण आता हा आजार तरुणांना सुद्धा होत आहे.

अमेरिकेच्या एका संशोधन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार २०१५ पर्यंत भारतातील ६.२ कोटी लोकांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यापैकी जवळजवळ २.३ करोड लोक 40 वर्षांखालील वयोगटातील होते. बारीक विचार केला तर हा खरोखर धक्कादायक अहवाल आहे.

म्हणूनच सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे आणि जेव्हा जेव्हा छातीत दुखत असेल तेव्हा त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

यातच अशाही काही गोष्टी आहेत ज्या हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करू शकतात. चला जाणून घेऊयात की त्या गोष्टी कोणत्या आहेत ? ज्याच्या सेवनाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका कमी करू शकतो …

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार ओमेगा-3 आयकोसा-पेंटानोईक ऍसिड आणि अल्फा-लिनोलिक ऍसिडचा आपल्या आहारात दररोज समावेश केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो.

अक्रोड

अक्रोड हे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. हे हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम कार्य करतं. याचं सेवन केल्यास स्ट्रोक आणि हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. त्यात सापडणाऱ्या अल्फा-लिनोलिक मुळे हृदयविकाराचा झटका येण्यापासून थांबु शकतो.

सोयाबीन

सोयाबीनमध्ये संतृप्त चरबीचं प्रमाण कमी असतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मधुमेहाच्या रुग्णांना सुद्धा सोयाबीनचं सेवन फायदेशीर आहे.

बदाम

बदामाचं सेवन हृदयासाठी फायदेशीर आहे. अनेक संशोधनात असं दिसून आलं आहे की जे लोक आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस बदामाचे सेवन करतात, त्यांच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत हृदयविकाराच्या झटक्याचा धोका 50% कमी होतो. म्हणून रोज बदामाचे सेवन केलेचं पाहिजे.

मासे

हृदयरोग टाळण्यासाठी माशांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानलं जातं. आठवड्यातून दोन वेळा माशांचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

हार्वर्ड मेडिकल स्कूलने केलेल्या संशोधनात असं समोर आलं आहे की जर आपण आपल्या आहारात माशाचा समावेश केला तर हृदयाच्या अनेक समस्या टाळता येतील. पण शक्य तितके तेल आणि मसाले वापरा.

टीपः हा सल्ला आपल्याला केवळ सामान्य माहिती देण्यासाठी दिला जात आहे. काहीही खाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.