काल इंस्टा ग्रामवर रुचिरा जाधव यांच्या अकाऊंटवर आम्ही एंगेजमेंट ची पोस्ट पाहिली. ज्यात अनाहूतपणे आमच्या गैरसमजाने रुचिरा जाधव यांचाच साखरपुडा आहे असं ग्राह्य धरून आर्टिकल लिहिण्यात आलं.

आणि ते सोशल मीडियावर वेब पोर्टल ला पोस्ट केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की चूक झाली आहे. तर ती चूक काय ? तर रुचिरा जी यांनी खाली अभिनेत्री ऋतुजा जाधव आणि अंकित ढगे यांना टॅग केलं होतं. ज्यांची एंगेजमेंट झालेली आहे खरी. रविवारी ३ जानेवारी रोजी ऋतुजा आणि अंकित ढगे यांचा साखरपुडा पार पडला. ‘ऋतुजा’ या रुचिरांजींच्या बहीण आहेत.

आणि त्यांच्या एंगेजमेंट च्या शुभेच्छा दिल्या होत्या. रुचिरा जी यांनी त्यांच्या अकाऊंटवर ऋतुजा यांच्या एंगेजमेंट ची पोस्ट केली होती हे नीट न पाहता आमच्या कडून मोठी चूक झाली. त्यामुळे आम्ही रुचिरा जी आणि सर्व वाचक आणि इतर सर्वांच्या ज्यांच्या कळत नकळत पणे भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागतो.

इथून पुढे आम्ही अशी चूक करणार नाही. आणि आपल्याला काळजीपूर्वक माहिती देण्याचा प्रयत्न असेल.

टीम स्टार मराठी