सध्या सोशल मीडियावर सगळेच पडीक असतात. त्यात कलाकार मंडळी तर खूप आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्ट आज व्हायरल होते. कारण ते त्यांच्या अकाऊंट वर अपलोड करत असतात. एका मालिकेत काम करणारी एक अभिनेत्री आहे जिचा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.

आणि तिला खूप ट्रोल केलं जात आहे. आता आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की त्या मालिकेचं नाव काय ? तर खूप लोकप्रिय अशी मालिका आहे, ती म्हणजे तारक मेहता. आणि त्यातील कलाकार अभिनेत्री कोण ? जी व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊयात.

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या घरातील व्यक्तींसारखेच वाटू लागले आहेत.

अनेक कलाकारांनी ही मालिका आता सोडली असली तरी प्रेक्षक अजूनही या कलाकारांना मालिकेतील नावावरुनच ओळखतात. निधी भानुशाली या अभिनेत्रीचंही तसंच झालं आहे. तिला अजूनही प्रेक्षक ‘तारक मेहता’मधील सोनू या नावानेच ओळखतात.

निधी भानुशालीने नुकताच एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिला अशा बोल्ड आणि हॉट लूकमध्ये बघण्याची चाहत्यांना सवय नाही. त्यामुळे निधीला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. निधीच्या व्हिडीओवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

काहींनी लिहीलं आहे की, ‘भिडे मास्तरांना हिचं लोकेशन सांगा’, ‘ही नक्की टप्पूची आयडिया असेल’ तसंच ‘भिडे मास्तरांचे संस्कार कुठे गेले?’ असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. निधीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

स्विमसूटमधील निधीच्या व्हिडीओला सगळ्यांनी ट्रोल केलं असं नाही. काही नेटकऱ्यांनी या तिच्या सौंदर्यांचं आणि बोल्डनेसचं कौतुक केलं आहे. यापूर्वीही एकदा निधीने बिकीनी फोटो शेअर केले होते. त्या फोटोंनंतरही निधी अशीच ट्रोल झाली होती.

निधीचा जन्म 16 मार्च 1999 मध्ये गुजरातमध्ये झाला होता. 2012 मध्ये तिने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत एन्ट्री घेतली होती. निधीने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. पण तारक मेहतामधील ‘सोनू’च्या भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.

असे अनेक कलाकार अभिनेते अभिनेत्री आहेत की ज्या त्यांच्या अपडेट मुळे व्हायरल होत असतात. कुणी एखाद्या विधानावरून व्हायरल होतात तर कुणी वेगळ्याच गोष्टी ने. तर असं आहे निधी म्हणजेच तारक मेहताच्या सोनीचं व्हायरल प्रकरण.