दाक्षिणात्य सिनेअभिनेत्री किर्ती सुरेश हिच्याबद्दल सध्याच्या घडीला एक मोठी बातमी सर्वच ठिकाणी चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या खाजगी आयुष्याबाबत तिचा चाहतावर्ग नेहमीच कुतूहलाने प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवत असताना आपल्याला पहायला मिळतो. किर्ती सुरेश हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तमाम भारतीयांना आपलसं करून सोडलं, आज तिचा चाहतावर्ग तमाम भारतभर पसरलेला पहायला मिळतो आहे.

चित्रपट निर्मिते सुरेश कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असलेल्या मेनका यांची मुलगी असलेली क्रिती आज चांगल्याच पद्धतीनं सिनेसृष्टीत दिमाखदाररित्या कार्य करत आहे. किर्तीबाबत एक गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे, ती म्हणजे ती बालवयापासूनच अभिनयाचं काम करत आहे.

वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी तिने एका मालिकेतही भुमिका साकारल्याची पहायला मिळाली होती. पुढे हळूहळू एक दोन मल्याळम सिनेमे केल्यानंतर किर्तीच्या वाट्याला चांगल्या सिनेमांची संधी चालून आली. प्रसिद्ध अभिनेते असलेले धनुष, विजय, नानी यांसारख्या कलाकारांसोबतही तिला भुमिका साकारायची संधी मिळाली.

यानंतर तिने तमीळ सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप पाडण्याची संधी सोडली नाही. आणि आता मुळात सारकाही ठिक चाललेलं असताना ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची गोष्ट सर्वत्र ऐकायला मिळत आहे. किर्ती लग्न करतेय या बातमीने सोशल मीडियावर सर्वांच लक्ष वेधून घेतल्याचं पहायला मिळते आहे. या चर्चांना जरी उधाण आलं असलं तरी किर्तीची यावर प्रतिक्रिया कधी आणि काय येते हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे.

मुळात अनेकदा किर्ती सुरेशच्या तिच्या लग्नाबाबतच्या चर्चा रंगल्याच्या सर्वांनीच पाहिल्या आहेत. अनेकांच्या मते तिच लग्न एखाद्या अभिनेत्यासोबत होणं, फारच उत्तम बाब ठरेल. परंतु सध्याच्या घडीला एका अशा कलाकारासोबत तिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत जो कलाकार एक अप्रतिम संगीत दिग्दर्शक आहे.

“अनिरुद्ध रविचंदर” हे नाव तुम्ही फार क्वचितच ऐकल असेल. पण दाक्षिणात्य सिनेमांमधे हे नाव म्हणजे एक एकमेवाद्वितीय कलाकाराची ओळख दर्शवत, हा कलाकार इतका यशस्वी आणि जबरदस्त कलेची खाण आहे असं म्हटल्या जाऊ शकतं. या संगीत दिग्दर्शकाने मास्टर, मारी, पेट्टा, दरबार, वेदालम, जर्सी, विक्रम वेधा यांसारख्या सिनेमांना आजवर संगीतबद्ध केलं आहे. अनिरुद्धच्या एकूण एक संगीताची ओळखच त्याच्या कलेची प्रचिती देऊन जाते.

एखादा संगीत कलाकार किती दर्जेदार आणि प्रचंड प्रमाणात कार्य करू शकतो, याच अनिरुद्ध एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अनिरुद्ध आणि किर्ती यांची केमिस्ट्री नेहमीच चांगली राहिल्याची पहायला मिळाली आहे. किर्तीच्या काही सिनेमानांदेखील त्यानेच संगीतबद्ध केलं आहे.

किर्ती मध्यंतरी तिच्या आवडीचा छंद अर्थात संगीतातली एक आवड जोपासताना पहायला मिळाली होती. आता तिची ती आवड अचानक सहज म्हणून जागी झाली असेल अथवा कोणाच्यातरी सान्निध्यात आल्याने घडलं असेल, याची थेट प्रचिती दोघांच्या लग्नाच्या निर्णयाच्या वेळीच कळेल, यात तिळमात्र शंका नाही. अद्यापतरी अनिरुद्ध अथवा क्रिती दोघांपैकी कोणीही लग्नाच्या बातमीला विशेष दुजारा दिलेला पहायला मिळतं नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!