छोट्या पडद्यावरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतील अजिंक्य आणि शीतली ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आणि त्याबरोबर आणखी एक नाव प्रेक्षकांनी उचलून धरले ते म्हणजे जयडी. अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देनारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले आहे. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले.

पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे. आता हीच पूर्वा शिंदे अतिशय हॉट अंदाजात झी युवा वरील ‘युवा डान्स क्वीन’ या सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो द्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे.

‘लागीर झालं जी’ या मालिकेत जयडी नेहमीच भारतीय पेहरावात दिसली आहे. पण खऱ्या आयुष्यात ती भरपूर मॉडर्न आहे. जयडीचा रील लुक आणि रियल लुक यांच्यामध्ये जराही साम्य नाही.

मालिकेतील साधी दिसणारी जयडीचा खरा हॉट आणि मॉडर्न लुक आपल्याला झी युवावरील युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात पहायला मिळेल. अतिशय सुंदर दिसणारी जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे आता तिच्या नृत्य आणि सौंदर्यच्या अदानी प्रेक्षकांना पुरते घायाळ करून सोडणार आहे.

युवा डान्सिंग क्वीन बद्दल पूर्वाला विचारले असता तिने सांगितले, ‘मी खरी कशी आहे हे तुम्हाला युवा डान्सिंग क्वीन या शोमुळे दाखवण्याची संधी मला झी युवा मुळे मिळाली आहे.

या शोमध्ये लोकनृत्य आणि वेस्टर्न डान्स एकत्र पाहायला मिळणार आहे. खरंतर मी जो काही डान्स आजपर्यंत केला आहे तो म्हणजे गणपती डान्स, जो आपण सगळेच करतो. पण आता जे डान्स फॉर्म मी करणार आहे ते जरी सोपे वाटतं असले तरी ते जराही सोपे नाही आहेत.

मी मुळात यातलं काहीच शिकलेली नसल्यामुळे माझ्यासाठी हे खूप कठीण असणार आहे. पण मला आतून असं वाटतं की हा शो माझ्यासाठी लकी असेल.”