ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

ॲसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. याची अनेक कारणे आहेत. धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे ॲसिडीटी आणि अपचन होते. त्यामुळेच पित्त, अपचन, ॲसिडीटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील. पण हे घरगुती उपाय अतिशय परिणामकारक आहेत.

पण हे उपाय खरचं परिणामकारक आहेत का ? असा प्रश्न तुमच्या मनात रेंगाळतोय? पण काळजी करु नका ॲसिडीटी, अपचन, हार्टबर्न यापासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करुन पहा…

ॲसिडीटीवर जेष्ठमध अतिशय फायदेशीर ठरते. याचे चूर्ण किंवा काढी बनवून प्यायल्यास आराम मिळतो. कडूलिंबाची सालही ॲसिडीटीवर उपयुक्त ठरते. रात्रभर कडूलिंबाची साल भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.

कोमट पाण्यात थोडी हळद, काळीमिरी पावडर आणि अर्धा लिंबू पिळून घाला. सकाळी हे पाणी प्यायल्याने आराम मिळेल. त्याचबरोबर आवळा, बेडीशेपचे चूर्ण बनवून सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा खा.

अधिकतर लोक बडीशेपचा माऊथ फ्रेशनर म्हणून वापर करतात. पण त्यात असलेल्या फ्लेवोनॉयड आणि प्लामेटिक ॲसिडमुळे बडीशेप एक प्रकारचे अँटी अल्सर देखील आहे. रात्री थोडीशी बडीशेप पाण्यात घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या. ॲसिडीटीपासून सुटका होईल.

थोडीशी बेडीशेप पाण्यात उकळवा. पाणी थंड करुन ते प्या. याचा खूप फायदा होईल. त्रिफळा चूर्ण देखील ॲसिडीटीवर उपयुक्त ठरेल. हे देखील कोमट पाण्यासोबत घ्या.

मनुके भिजवून ठेवा. सकाळी दूधात घालून उकळवा. त्यानंतर थंड करून ते दूध प्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने देखील ॲसिडीटीची समस्या दूर होते.

लवंग ॲसिडीटीपासून सुटका करुन देण्यास फायदेशीर ठरते. लवंग खाल्याने जी लाळ निर्माण होते त्याचा अन्न पचनास फायदा होतो. ॲसिडीटीसारखे वाटल्यास तोंडात लवंग घालून हळूहळू चघळा. असे केल्याने काही वेळात तुम्हाला आराम मिळेल.

तुळस हा स्वयंपाकघरातील एक भाग नसला तरी प्रत्येकाच्या दारी असतेच आणि तुळशीचे महत्त्वही मोठे आहे. पोटात ॲसिडचा प्रभाव कमी करण्यासाठी तुळशीची पाने उपयुक्त ठरतात. म्हणूनच जेवणानंतर तुळशीची पाने चघळा. यामुळे ॲसिडीटीची समस्या झटपट दूर होईल.

वरील लेखमधील दिलेले उपाय आपल्यासाठी योग्य असतीलच असे नाही, कोणताही उपाय करण्या अगोदर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.