हिंदी सिनेसृष्टी अर्थात बॉलीवुडमधील कलाकारांच्या लक्झरी आयुष्याबाबत नेहमीच आपल्याला एक कुतूहल लागून राहिलेलं असतं, एकतर तसं काहीसं जगता यायला हवं किंवा किमान तसा एखादा प्रयत्न तरी करावा ही एका सामन्य माणसाची ईच्छा कधीतरी झालेलीच असते. मुळात हे कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक उत्तम क्षण काही खास ठराविक गोष्टींकरता घालवत असतात हे आपल्याला बऱ्याचदा पहायला मिळतं.

मग त्यासाठी त्यांना कितीही पैसा मोजावा लागला तरी तरी ते एखादी गोष्ट करतील, हे निश्चितच. तर आज आपण अशाच पाच कलाकारांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी हौसेपोटी वा आपली लक्झरी आयुष्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी थेट परदेशात संपत्ती खरेदी केलेली आहे.

तर या यादीत पहिलं नाव येत ते म्हणजे, बॉलीवुडचे बिग बी असलेले अमिताभ बच्चन यांच. अमिताभ बच्चन यांची तमाम जगतात एक ओळख निर्माण झाली ती त्यांच्या कार्यामुळेच. एक हरहुन्नरी अभिनेते आहेत जे आज वयाच्या सत्तरीतही कार्यरत आहेत, ज्यांनी आजवर हिंदी सिनेसृष्टीला प्रचंड दर्जेदार हिट सिनेमे दिले.

तुमचा विश्वास बसणार नाही परंतु चक्क पॅरिसमधे अमिताभ यांचा एक बंगला आहे. अमिताभ यांनी त्यांची पत्नी जया बच्चन यांना भेट म्हणून हे घर दिलं होतं. अमिताभ यांची संपत्ती तशी पाहता भरपूर प्रमाणात आहे. अमिताभ बच्चन यांनी परदेशात तर आपला बंगला घेतलेलाच आहे शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचे तब्बल पाच बंगले आहेत.

यानंतर येणारी कलाकार म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीकडेदेखील फार चांगल्या प्रमाणात संपत्ती उपलब्ध असल्याने तीदेखील बऱ्याच प्रमाणात आलीशान जिंदगी जगत असताना पहायला मिळते. लंडन आणि कॅनडा यांसारख्या ठिकाणी शिल्पाची परदेशीय संपत्ती असल्याची पहायला मिळते. शिल्पाने दुबईला चक्क बुर्ज खलिफा येथेदेखील फ्लॅट खरेदी केला होता परंतु काही कारणास्तव तिने तो नंतर विक्रीस काढला.

असं म्हटलं जातं तिने तिच्या पतीला अर्थात राज कुंद्रा यांना तो गिफ्ट केला होता. शिल्पा शेट्टी हिने हिंदी सिनेसृष्टीत तिचा अगदी काळ गाजवला आहे. तिचा पती बिझनेसमॅन तर आहेच शिवाय शिल्पाकडेही तिच्या संपत्तीची काहीच कमी नाहीये. शिल्पाचे परदेशात तब्बल चार फ्लॅट्स आहेत. शिल्पाची परदेशातली सगळी संपत्ती नाही म्हटलं तरी एकूण 170 कोटींच्या घरात जाते.

यापुढे जो कलाकार आहे, त्याची ओळखच हिंदी सिनेसृष्टीत आता एक मास हिरो अशी झालेली आहे. त्याला कारण म्हणजे त्याच्या सिनेमांची रचना हिच अ‍ॅक्शनपट असल्याची पहायला मिळते. तो अभिनेता म्हणजे, जॉन अब्राहम. हे फार क्वचित लोकांना माहित आहे की जॉन अगदी लॅव्हिश लाईफस्टाईलमधे जगणं पसंत करतो. तो बऱ्याचदा स्टाईल आणि फॅशनचा चांगला शौकीन असल्याच पहायला मिळालं आहे.

तर अलीकडेच त्याचा मुंबई सागा हा सिनेमादेखील प्रसिद्ध झाला आणि त्याच्या या सिनेमाने चांगलीच कमाईदेखील केल्याची पहायला मिळाली. जॉन अब्राहम त्याच्या आलीशान राहण्याच्या बाबतीत म्हणालं तर आता त्याच्या परदेशात असलेल्या संपत्तीचा विचार डोक्यात येतो, जॉनचा चक्क लॉस अंजेलीस या अमेरिकेतल्या ठिकाणी सर्वाधिक महागडा फ्लॅट आहे. तब्बल ६००० स्केअर फुट इतक्या जागेत त्याची प्रॉपर्टी सामावलेली पहायला मिळते. त्याच्या या फ्लॅटचं इंटेरियर डिझाईन आणि फर्नीचर्सची रचना अगदी मोहात पाडून टाकणारी आहे, असं म्हणता येऊ शकतं.

पुढे असलेला कलाकार म्हणजे सध्याच्या घडीला जराही आराम न करता सतत रसिकप्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन चित्रपट घेऊन येणारा खिलाडी अक्षय कुमार. अक्षय कुमार याने गेल्या काही काळापासून आपलं स्वत:च वर्चस्व हिंदी सिनेसृष्टीत चांगल्याच पद्धतीने प्रस्थापित केल्याच आपण पाहिलं आहे.

आज अक्षय कुमार याच्याकडे पुष्कळ प्रमाणात पैसा आणि इतर संपत्ती दोन्ही आहे. हिंदी सिनेमांमधे सध्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय सध्यातरी टॉपवर आहे. अक्षय कुमार याने कॅनडा या देशात आपली संपत्ती घेतलेली पहायला मिळते. अक्षयने कॅनडात एक अपार्टमेंट आणि एक बंगला अशे दोन वास्तव्याचे ठिकाण खरेदी केलेले आहेत. अक्षयची ही प्रॉपर्टी चांगलीच आलीशान आणि लक्झरीयस असल्याची पहायला मिळते.

यानंतर बोलायचं म्हटलं तर तो आहे खुद्द बॉलीवुडचा किंग खान. अर्थातचं अभिनेता शाहरूख खान. शाहरुख त्याच्या एखाद्या निवडीबाबत फारच कमीटेड असल्याच आजवर अनेकदा पाहिल्या गेलं आहे. मग त्यासाठी त्याने गौरीला मिळवण्यासाठी केलेली धडपढ असो, हिंदी चित्रपटांमधे येण्यासाठी केलेला जिद्दीने प्रवास असो वा इतर कोणतीही गोष्ट असो. तर शाहरुख खान याने दुबई आणि लंडन या दोन्ही ठिकाणी स्वत:ची प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे.

शाहरुख खान हा भारताव्यतिरिक्त अनेक देशांमधे एक अभिनेता म्हणून पोहोचला, त्याची ओळख आज जगभर गाजलेली आहे. आणि सामान्य कुटुंबातून आलेला एक मुलगा आज बॉलीवुडवर अधिराज्य गाजवतो, हे नक्कीच सर्वांकरता प्रेरणादायी ठरतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!