purushottam-berde-ga-saha-janiUpcoming Serial Ga Sahajani

गेली चार दशकं मराठी सिनेनाट्य क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे पुरुषोत्तम बेर्डे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ‘ग … सहाजणी’ या हटके मालिकेची निर्मिती  पुरुषोत्तम बेर्डे करत असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन येत आहेत. १० ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत आहे.
ga-sahajani

 

एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची ही गोष्ट आहे. या सहाजणी प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील यात काही शंका नाही. शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पोर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोडवळकर अशी एकापेक्षा एक सहाजणींची दमदार स्टारकास्ट या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत आहे.

purushottam-berde-image

प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या कलाकृती पुरुषोत्तम बेर्डे यांनी या आधी निर्माण केल्या आहेत. निर्मळ विनोद आणि तिरकस विचार ही त्यांची खासियत. त्यामुळे ‘ग … सहाजणी’  काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नुकताच या मालिकेचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे त्याला प्रेक्षकांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला आहे.

 

star-pravah-new-logo-red

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here