the-first-ever-marathi-cinema-to-be-shot-in-america-a-dot-com-mom





Movie : A Dot Com Mom (2016)
अमेरिकेत चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा

अ डॉट कॉम मॉम प्रदर्शित होणार 30 सप्टेंबरला

जगात देवानंतर आईचं स्थान मानलं जातं. मुलांसाठी निस्वार्थ मनाने झटणाऱ्या आईचे मन निर्मळ आणि प्रेमळ असते. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी तडजोडी करत असते.

अशाच एका साध्या भोळ्या आईची कथा आपल्याला ‘अ डॉट कॉम मॉम’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नाट्यसृष्टीत आपले नाते खणखणीत वाजवणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर ‘अ डॉट कॉम मॉम’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.

आपल्या मुलाच्या आग्रहाखातर अमेरिकेत गेलेल्या आईची उडणारी तारांबळ या चित्रपटात विनोदी पध्दतीने मांडण्यात आली आहे. एकीकडे मॉडर्न सून तर दुसरीकडे आपला मुलगा यांच्या अपेक्षांचं ओझं पाठीवर घेऊन ही आई वेगवेगळे कर्तब करताना आपल्याला दिसते.

A Dot Com Mom (2016) Marathi Movie Mp3 Songs Free Download


a-dot-com-mom

 

नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मुलगा – सूनेमध्ये या आईची उडणारी धावपळ दाखवण्यात आली आहे. अमेरिकेत चित्रित झालेला हा पहिलाच मराठी सिनेमा…ज्यात भारतीय आईचा अमेरिकन मॉम पर्यंतचा प्रवास विनोदाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

सुंदरा मनामध्ये भरली आणि अवघा रंग एकचि झाला अशी दर्जेदार नाटके मराठी नाट्यसृष्टीला देणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर यांची निर्मिती असलेला हा “अ डॉट कॉम मॉम”… गेली अनेक वर्ष त्यांनी रविवारच्या सामना या दैनिकात तर लोकप्रभा या मासिकात लिखाण केले, तसेच ‘धन्य ती गायनॅक कला’ आणि ‘ठसे माणसांचे’ यांसारखी पुस्तकेही लिहिली.

या सिनेमाच्या निर्मितीसोबतचं संवाद लेखन, गीत लेखन, कोरिओग्राफी आणि दिग्दर्शनाची धुरा डॉ. मीना नेरुरकर यांनी सांभाळली आहे. सुनील जाधव यांनी सिनेमाचे संकलन केले असून विनायक राधाकृष्ण आणि हैदर बिलग्रामी यांनी छायाचित्रीकरण केले आहे.

सुधीर फडके, अशोक पत्की, एन. दत्ता या दिग्गजांसोबत नील नाडकर्णी, प्रतिक शाह यांनी सिनेमाला सुमधुर असे संगीत दिग्दर्शन लाभले आहे. जगदीश खेबुडकर, डॉ. मीना नेरुरकर तसेच नील नाडकर्णी  यांनी लिहिलेल्या गीतांना देवकी पंडीत, नील नाडकर्णी आणि निदा, निलिजा, अंकुर्म यांनी आपला सुरेल आवाज दिला आहे.

कायान प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून जीसिम्सचे अर्जुन सिंग बर्हान आणि कार्तिक निशानदार हे या सिनेमाचे प्रेझेंटर आहेत.

असा हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here