आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी प्रचंड प्रमाणात व्हायरल तर होतच असतात शिवाय अनेक गोष्टींचे मिम्सदेखील तयार होत असतात. मिम्स हा चित्रांच्या आधारे संदर्भ लावत बनवलेले विनोदाचे भाग असतात. तर अशेच भन्नाट विनोदी मिम्स एका मराठी मालिकेचे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत असताना पहायला मिळत आहेत. “येऊ तशी कशी मी नांदायला” ही मालिका सुरू झाल्याच्या अवघ्या काहीच कालावधीत रसिकप्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करू लागल्याची पहायला मिळत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा मालिका, गॉसिपिंग, सिनेमे, स्टारकास्ट यांची चर्चा रंगलेली पहायला मिळतं असते. तर सध्याच्या घडीला या मराठी मालिकेच्या सिन्सवर व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून मिम्स बनू लागल्याचे पहायला मिळत आहेत. सासू सुनेचा ड्रामा एका वेगळ्या पद्धतीने रंगवत या मालिकेने रसिकप्रेक्षकांना मनोरंजनाची एक वेगळीच बाजू टेलीव्हीजनवर समोर आणून दिली आहे.
आज मराठी टिव्ही क्षेत्रात मालिकेंच्या बाबतीत चांगल्याच कथानकांची निर्मिती होत असलेली पहायला मिळत आहे. यांपैकी अनेक मालिका आयुष्यात घडणाऱ्या वास्तव परिस्थितींवर अवलंबून असल्याने प्रेक्षकांना त्या आवडण्याच प्रमाणही वाढलं आहे. खरतरं प्रेक्षक स्वत:च प्रतिबिंब एखाद्यातरी पात्रात आज टेलीव्हिजनच्या माध्यमातून येणाऱ्या मालिकांमधून पाहतो आहे.
तर आता मुळात आपण झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या “येऊ तशी कशी मी नांदायला” या मालिकेवर तयार होऊ लागलेल्या काही मिम्सवर एक नजर टाकूयात. झी मराठी वाहिनीवरील प्रचंड गाजलेल्या मालिकांनी निरोप घेतल्यानंतर ही नवी मालिका प्रेक्षकांच्या निश्चितच पसंतीस उतरली आहे.
“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेमधील एका भागादरम्यान महत्वाची लीड भुमिका निभावत असलेली “स्वीटू” ही ट्रेनमध्ये चक्क झोपी जाते. आणि तिचा उतरण्याचा स्पॉट निघून जातो, तर या घटनेला पकडून पॉकीमॉन या प्रचंड गाजलेल्या अनिमेचं चित्र वापरत त्याचा मिम बनवण्यात आला. या मिमच्या चित्रात झोपी गेलेल्या पात्राला इतर सर्वजण अंबरनाथ आलं स्वीटू उठ असं सांगत असताना पहायला मिळतात.
या मिम व्यतिरिक्त इतरही जे काही मिम्स भन्नाट व्हायरलं झाले, त्यांपैकी एक म्हणजे “स्नोरलॅक्स दाखवा, थोडा स्वस्तातला” अशा आशयाला ठेवून एक अनिमे कार्टून आधीच्या चित्रात व पुढे स्वीटू चा ट्रेनमधील लुक जोडण्यात आला आहे. हे मिमदेखील सोशल मीडियावर चांगलाच भाव खाऊन गेलेलं पहायला मिळतं. रेल्वेमधे बसलेली स्वीटू खरतरं झोपी गेल्याने थेट कारशेडपर्यंत जाऊन पोहोचल्याची मालिकेत दाखवण्यात आली आहे.
पुढे एका मिमची क्रिएटिव्हीटी तर फारच चांगली पहायला मिळते. यामधे मुंबई – पुणे – मुंबई या चित्रपटाच्या पोस्टरचा वापर करत तिथे नाव बदलून हा प्रवास अंबरनाथ – मुंबई – अंबरनाथ असा दाखवण्यात आला. आणि या पोस्टरवर स्वीटू व मुख्य भुमिकेतील अभिनेत्याचा फोटो लावण्यात आला आहे. अशा एक ना अनेक प्रकारच्या मिम्सचा रोज जोरदार पाऊस सोशल मीडियावर पडताना पहायला मिळतो आहे. एकप्रकारे या मालिकेने नाही म्हटलं तरी रसिकप्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केल्याची पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!