काही वर्षांपूर्वी “ गाढवाचं लग्न ” हा मराठी चित्रपट खूप गाजला होता. त्यातील विनोदी बाज, मकरंद अनासपुरे यांचा अप्रतिम अभिनय अश्या सगळ्या गोष्टीमुळे तो सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता.

तेव्हापासून आजही लोकं शक्य होईल तसा तो चित्रपट पाहून तणावमुक्त होत असतात. कारण तो चित्रपट खूप मसालेदार कॉमेडीने, अफाट मनोरंजनाने भरलेला आहे. त्यात सगळ्यात आकर्षित करणारी बाब म्हणजे त्यातील मकरंद अनासपुरे यांच्यासोबत भूमिका करणारी अभिनेत्री. तिच्या गावरान शैली मुळे तर त्या चित्रपटाला चार चांद लागले.

तिची अदा लोकांना इतकी आवडली की घराघरात चित्रपटाचा प्रभाव म्हणून बायका वागू लागल्या. यामुळे नवऱ्यांची पंचायत झाली ते मात्र खरं. गाढवाचं लग्न या मराठी चित्रपटातून अभिनय साकारून धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे राजश्री लांडगे.

मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे यांच्या जोडीने त्या चित्रपटात खूप धमाल कमाल अभिनय केला होता. तिच्या भूमिकेचं नाव होतं गंगी म्हणजेच सावळ्या कुंभाराची गंगी. साऱ्यांच्या आवडत्या गंगीला रसिक त्याचं भूमिकेत आज जरी पाहत असले तरी काळानुसार माणूस बदलतो. तशी गंगी ही खूप बदलली आहे. तेव्हाची गंगी आणि न आत्ताची यामध्ये खूप फरक आहे. तिला ओळखणं आता खूप कठीण आहे.

पडद्यावर गावरान अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणारी गंगी खऱ्या आयुष्यात मात्र खूप ग्ल्यामर आहे. चित्रपटात साडी चोळीत दिसणारी गंगी तिच्या जीवनात मॉडेलिंग दुनिया सारखी जगते. तशी राहते. तिने काही दिवसांपूर्वी काही ग्ल्यामर अंदाजात काढलेले फोटो सोशल मिडीयावर टाकले होते. तेव्हा तिचा हा ग्ल्यामर अंदाज ही लोकांना खूप आवडत आहे.

तिने गाढवाच्या लग्नानंतर मात्र ग्रामीण भूमिका फार साकारल्या नाही पण त्याच्या कामामुळे तिचं नाव मात्र खूप झालं. आणि तिला अनेक भूमिका मिळायला लागल्या. त्यामध्ये सिटीझन मराठी चित्रपटा मध्ये सुद्धा शहरी ग्ल्यामर मुलीची तिने खूप भूमिका साकारली आहे.

ती सध्या तिच्या फिटनेस वर काम करत आहे. तिचे काही प्रोजेक्ट सुद्धा आता लवकरच प्रेक्षकांना भेटीस येणार आहेत. त्यामुळे सध्या ती मॉडेलिंग फोटो वर काम करत आहे. तिने अनेक बोल्ड मध्ये मोडणारे फोटो शूट केलेले आहेत. ते सगळे फोटो सध्या ती तिच्या सोशल मिडीयावर शेयर करत आहे. लोकांना तिचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

तिने फेमस केलेल्या गंगीला अजूनही लोक तितकच प्रेम करतात जेवढं आधी करायचे. लॉक डाऊन मध्ये वेळ घालवण्यासाठी अनेकांनी हा चित्रपट पाहून वेळ घालवला आहे. तिचं काम लोकांच्या मनात घर करून गेलं. तिला तिच्या पुढील भावी आयुष्यासाठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्या.