ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधे आनंद चा रोल करणारा अभिनेता मिहीर राजदा आणि त्याची हिंदी मालिकांमधून काम करणारी पत्नी निलम पांचाल यांचा प्रेम विवाह झालेला आहे. यांची लव्ह स्टोरी सुद्धा एखाद्या मालिकेच्या कथेपेक्षा कमी नाहीय.

छोट्या पडद्यावर झी मराठी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतील सर्व कलाकारांच्या भूमिका मराठी प्रेक्षकांना आवडत आहेत.मालिकेत राधिकाच्या “राधिका मसाले” या कंपनीत काम करणारा आनंद, गुजराथी दाखवण्यात आला आहे.

आणि योगायोग असा की, खऱ्या जीवनातही आनंद गुजराथी असून त्याचे नाव मिहीर निशीथ राजदा असं आहे. मुंबईत जन्म झाला असल्यामुळे आनंद ही भूमिका साकारताना चांगल्या पद्धतीने मराठी बोलतो. अभिनया सोबतच तो पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार सुद्धा आहे. त्याने मराठीत अनेक नाटकं लिहिली आहेत, गोष्ट तशी गमतीची आणि डोन्ट वरी बी हॅपी इ. त्याची नाटके गाजली.

यासाठी मिहीरने राज्य पुरस्कारही जिंकला होता. नाटके, कथा, पटकथे व्यतिरिक्त मिहिरने रंगमंचही गाजवला आहे. संस्कृत कलादर्पण, सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कारासह त्याने बरेच लेखन व अभिनयाचे पुरस्कार मिळवले आहेत. मिहीर हिंदी टीव्ही मालिकेतही झळकला आहे. “हमारी देवरानी” या मालिकेत तो केतन नानावटी म्हणून दिसला.

मिहिरने “मेरी आशिकी तुमसे है” या मालिकेत मनोहर पारेखची भूमिका साकारली होती. मिहीर राजदाने लोकप्रिय अभिनेत्री, निलम पांचालशी लग्न केले आहे. “हमारी देवरानी”(याच मालिकेत निलम आणि मिहीर चे सूर जुळले) ‘रुक जाना नहीं’ आणि ‘एक वीर की अरदास वीरा’ या मालिकेतल्या निलमच्या भूमिका लोकप्रिय आहेत.

मिहीरने मुंबई विद्यापीठातून कॉमर्सची पदवी घेतली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तो एकांकिकांमध्ये सहभागी होऊ लागला. त्याचा अभिनय पाहून मित्रांनी त्याला याच क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. मित्रांमुळेच त्याला व्यावसायिक नाटकंसुद्धा मिळाली. महाविद्यालयीन जीवनातील मिहारचे फोटो पाहिल्यास हाच का तो मिहीर असा प्रश्न कुणालाही पडेल.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील आनंद आणि खऱ्या आयुष्यातील मिहीर राजदा यांची लव्ह स्टोरी थोडीशी मिळती जुळती आहे. मिहीरने खऱ्या आयुष्यातही मध्ये घरच्यांच्या परवानगीने एका मराठी मुलीशी प्रेमविवाह केला आहे. मिहीर राजदा आणि नीलम पांचाळ २०१० साली लग्नाच्या रेशीमगाठीत अडकले.

या दोघांच्या संसार वेलीवर २०१३ साली मुलीच्या रूपाने एका गोंडस फुल उमलले. निलम मधील “नि” आणि मिहीर मधील “हिर” शब्द एकत्र करून त्यांनी आपल्या मुलीचे नाव “निहिरा” ठेवले आहे. ज्याचा अर्थ “नव्याने सापडलेला खजिना” असा होतो. आपल्या परिवारासह मिहीर नवी मुंबईमधे राहतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.