सध्या एक मराठी मालिका अशी आहे की ती प्रचंड गाजत आहे. त्या मालिकेचं नाव काय आहे हा प्रश्न आपल्याला प’ड’ला असेल, तर त्या मालिकेचं नाव आहे सुंदरा मनामध्ये भरली. त्यातील सर्वच पात्र खूप लोकप्रिय आहेत. त्यात हेमा हे पात्र ही प्रेक्षकांना फार आवडत आहे. चला तर त्या पात्राला साकारणाऱ्या अभिनेत्री च्या खऱ्या आयुष्यात काय चाललं जाणून घेऊयात.

मराठी टेलिव्हिजनवर अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले आहे. कमी वेळात त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ती म्हणजे हेमा. आणि आता हेमा म्हणजे कोण ?

ही मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रमिती नरके आहे. ही सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काम करत आहे. मालिकेत ती हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे. ही प्रमितीची पहीली मालिका नाही.

या अगोदरही तिने मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. प्रमितीने या अगोदर कलर्स मराठीवरील ‘तु माझा सांगाती’ मालिकेत अवलीची भुमिका साकारली होती. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

प्रमितीचा जन्म पुण्यात झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातच झाले. तिला नेहमीपासूनच अभिनयात रुची होती.

त्यामूळे तिने शाळेत आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तिला या गोष्टीचा तिच्या करिअरमध्ये चांगलाच फायदा झाला.

तिने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने पुढील करिअरसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

तिथे तिने मालिका आणि चित्रपटांसाठी ऑडीशन द्यायला सुरुवात केली. तिने अनेक दिवस मेहनत केली. या कालावधीमध्ये तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

तिला कलर्स मराठीच्या तु माझा सांगाती मालिकेत अवलीची भुमिका मिळाली. तिने अतिशय उत्तम पद्धतीने अवलीची भुमिका छोट्या पडद्यावर साकारली.

तिच्या या भुमिकेचं आणि अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले. आजही या मालिकेतील तिच्या कामाचे कौतूक केले जाते.

या मालिकेने तिला घराघरात ओळख निर्माण करुन दिली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली होती. आजही लोकं या मालिकेची आठवण काढतात.

त्यावेळी अवलीच्या भुमिकेची आठवण काढतात. मालिकेनंतर तिने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

प्रमितीची अनेक नाटकं हिट झाली आहेत. त्यासोबतच तिने अनेक शॉर्ट फिल्म्स देखील काम केले आहे. ‘डोह’ या शॉर्टफिल्मसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिचं ‘रीड मी इन 5D झोनं’ हे नाटकं विशेष गाजलं.

आज प्रमिती कलर्स मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला देखील लोकांनी खुप पसंत केले आहे. या मालिकेत तिची थोडी न’का’रा’त्म’क भुमिका आहे. वेगवेगळ्या भुमिका करुन ती तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवत आहे.

तिला तिच्या पुढील वाटचाली करिता स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.