सध्या झी मराठी वर एक नवीन मालिका आलेली आहे. ज्यात अनेक जुने लोकप्रिय असे कलाकार काम करत आहेत. त्यात काही नवीन ही काम करत आहेत. शशांक केतकर ही त्यात आहे.

त्याच सोबत शशांक सोबत टिझर मध्ये जी मुलगी दिसली तिची सगळीकडे सध्या चर्चा चालू आहे. की ती नेमकं कोण ? ते चला मग आपण आज तेच जाणून घेणार आहोत. जी एक अभिनेत्री म्हणून सध्या पुढे येत आहे.

झी मराठी वाहिनीवर कोठारे व्हिजन प्रस्तुत “पाहिले न मी तुला” ही नवी मालिका प्रसारित होत आहे. येत्या १ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ही मालिका झी वाहिनीवर प्रसारित होत आहे.

या मालिकेमुळे ‘लाडाची मी लेक गं’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशीच सध्या चर्चा सुरू आहे. तुर्तास येणाऱ्या या नव्या मालिकेतील कलाकारांबद्दल अधिक जाणून घेऊयात…

पाहिले न मी तुला या मालिकेचा प्रोमो नुकताच पाहायला मिळाला या प्रोमोमध्ये अभिनेता शशांक केतकर आणि माझा होशील ना मालिकेतील सुयश अर्थात अभिनेता आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

झी मराठी वरील नव्या मालिकेत शशांक आणि आशय सोबत दिसणारी अभिनेत्री नवखी असल्याने ती नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या नवख्या अभिनेत्रीचे नाव आहे “तन्वी प्रकाश मुंडळे”.

तन्वीने मुंबई विद्यापीठातून फिजिक्स मधून बीएस्सीची पदवी प्राप्त केली आहे. अभिनयाची आवड असलेल्या तन्वीने ललित कला केंद्र मध्ये प्रवेश मिळवला होता. ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

याचबरोबर येत्या २ जुलै २०२१ रोजी सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला “COLORफुल” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात तन्वी देखील झळकणार आहे.

हा तिने अभिनित केलेला पहिलाच चित्रपट त्यानंतर ती पहिल्यांदाच पाहिले न मी तुला या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे आणि तेही चक्क झी वाहिनीच्या मालिकेतून त्यामुळे तन्वी आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे. तन्वी मुंडळे हिला तिच्या पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त खुप खुप शुभेच्छा…

कारण तन्वी एक नवीन अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे, म्हणजे तिला पहिलाच ब्रेक आता खूप चांगला मिळाला आहे. तर खरचं तिला पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.