अनेकांसाठी बॉलिवूड एक स्वप्न आहे. पण बॉलिवूड प्रत्येकासाठी नाही. काहीजणांना याची जाणीव लवकर होते आणि जीवनात वेगळं काही करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात, तर काहीजण हे सगळं थांबविण्यापर्यंत प्रयत्न करत असतात.

अशा अनुभवांमुळे आणि नकारांमुळे अनेक सेलिब्रिटींना अचानक ह्या चंदेरी दुनियेतून गायब होताना आणि विस्मृतीत जाताना आपण पाहिले आहे, “ते कुठे आहेत, ते कसे आहेत …” असा प्रश्न आपल्याला पडतो. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अंतरा माळी. ‘मैं माधुरी दिक्षित बनना चाहती हूँ’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंतरा माळी सध्या कुठे आहे आणि ती काय करत आहे. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अंतरा माळी ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी एकही हिट चित्रपट दिला नाही. अंतराने 1998 साली ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. 2000 च्या सुरवातीला राम गोपाल वर्मा ह्यांची निळ्या डोळ्यांची अभिनेत्री म्हणून अंतरा माळी ओळखल्या जायची.

अंतरा प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांची मुलगी आहे. अंतराने सुरुवातीला तेलगू चित्रपटात काम केले. काही काळानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले पण तिचा हा प्रयत्न कधीही यशस्वी झाला नाही. २०१० मध्ये अंतरा शेवटची ‘अ‍ॅन्ड वन्स अगेन’ ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

रोड, डरना माना है, आणि नाच हे तिचे काही नामांकित चित्रपट आहेत. ह्या चित्रपटातून ती अभिषेक बच्चनसोबत दिसून आली. जरी हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले नाही तरी, ह्या चित्रपटांनी तिला ओळख मिळवून दिली ज्यामुळे तिला निर्मात्यांकडून आणखी मोठ्या भूमिका मिळविण्यात मदत झाली.

जेव्हा तिचा अभिनय प्रेक्षकांना भावला नाही, तेव्हा अंतराने इतर सर्जनशीलतेच्या माध्यमातून यश मिळविण्याचा प्रयत्न केला. 2005 मध्ये ती ‘मिस्टर या मिस’ या कॉमेडी चित्रपटाची पटकथा लेखक आणि दिग्दर्शक बनली. ह्या चित्रपटात अंतरा सोबत आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसून आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कामगिरी केली असली तरी समीक्षकांकडून मात्र फारशी दाद नाही मिळाली.

अंतराने आपल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत फक्त 12 चित्रपट केले. त्यापैकी कोणाताही चित्रपट हिट ठरला नाही. अनेक प्रयत्न करूनही अंतराला यश आले नाही. ह्या अपयशामुळे अंतराने ह्या उद्योगातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

जून 2009 मध्ये एका समारंभात, अंतराने प्रियकर चे कुरीन यांच्याशी लग्न केले, कुरीन हे जीक्यू मॅगझिनचे संपादक आहेत. अनेक फ्लॉप चित्रपट देऊन ही कुरीन ह्यांच्याशी लग्न केल्यानंतर अंतरा करोडोंची मालकीण झाली आहे. अंतराने बॉलिवूडपासून दूर राहून लो प्रोफाइल जीवन जगण्याला प्राधान्य दिलेले असल्याने तिची आणि कुरीन ह्यांची भेट कुठे झाली ह्याबद्दल किंवा त्यांच्या संबंधांबद्दल फारशी माहिती नाही.

2012 मध्ये अंतराने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. पॉप-कल्चर मॅगझिनच्या प्रसिद्धी आणि मुख्य बातम्यांपासून दूर राहून अंतरा आता आनंदाने परिपूर्ण आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. आणि तिला ह्या गोष्टीचा आनंद आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.