लोकप्रिय कलाकार यांची लहान मुले सोशल मीडियावर फार चर्चेत असतात. मग तो सैफ अली चा तैमर असो किंवा इतर कुणाचा. तैमुर हा तर एवढा लोकप्रिय झाला आहे की मीडिया त्याच्यासाठीच आहे की काय असं झालं होतं.

तसे सध्या तैमुर नाही तर या स्टार किड्स ची सध्या सोशल मीडियावर हवा चाललेली आहे. कोण ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड कलाकारांसोबतच स्टार किड्स देखील सतत चर्चेत असतात. त्यामध्ये सैफ अली खान आणि करिनाचा मुलगा तैमूर, कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया, शाहरुख आणि गौरी खानचा मुलगा अब्रहम, शाहिद आणि मीरा कपूरची मुलगी मीशा यांचा समावेश आहे.

मात्र असा एक स्टारकिड आहे जो लाइमलाइटपासून दूर आहे पण अतिशय क्यूट आहे. हा स्टारकिड म्हणजे अभिनेता अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डिमेट्रिएड्सचा मुलगा.

अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या मुलाचे नाव आरिक आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ हे सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच आरिकचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो आईसोबत चालताना दिसत आहे.

दरम्यान आरिक अतिशय क्यूट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा व’र्षा’व केला आहे.

अर्जुन रामपालने पत्नी मेहर जेसिला घ’ट’स्फो’ट दिल्यानंतर तो गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे. अर्जुनला दोन मुली आहेत. मिहिका आणि मायरा. त्यानंतर जुलै २०१९मध्ये तो पुन्हा बाबा झाला. तेव्हा त्याने त्याच्या मुलाचे नाव आरिक ठेवले.

तर तैमुर एकेकाळी होता चर्चेत पण आता हा मुलगा आहे. आणि इथून पुढेही तोच चर्चेत राहणार आहे. तर त्याला पुढील वाटचाली करीता खूप शुभेच्छा.