सध्या एक मालिका झी मराठी वर खूप लोकप्रिय होत आहे. यशाचं शिखर ती सर करत आहे. म्हणजे 4 ते 5 वर्ष झाले ती मालिका चालू आहे. सं’प’वा’य’चं नावच निघत नाहीये. टीआरपी च्या बाबत तर मालिका सतत आघाडीवर असते.

ज्या मालिकेत गुरुनाथ खूप फेमस आहे. आता आपल्याला नाव आठवलेलं असेल. नाही ? चला तर मग जाणून घेऊयात की ती अभिनेत्री आणि मालिका कोणती ?… माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिकाच्या भूमिकेत आपल्याला अनिता दातेला पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळे तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. अनिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

तिने सोशल मीडियावर नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनिताचा लूक खूपच वेगळा दिसत असून या फोटोत तिला ओळखणे देखील क’ठी’ण जात आहे. अनिता या फोटोत खूपच छान दिसत असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. तिच्या या फोटोला अनेक लाईक मिळाले असून तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत.

तू छान दिसत असून तुझी स्माईल देखील खूपच छान आहे असे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिका म्हणजेच अनिता दातेने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे तिच्या करियरला एक वळण मिळाले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली आहे.

अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

अनिता दाते सध्या घराघरात पोचलेली अभिनेत्री आहे. माझ्या नवऱ्याची बायको मधील राधिका म्हणून तर तिला खूप ओळख आहे. तिच्या नवऱ्याचं नाव आहे, चिन्मय केळकर. जो स्वतः एक दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. या दोघांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.