मराठी मालिकांमध्ये कोण कोणती भूमिका साकारत आहे ? आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसं आहे ? हे जाणुन घेण्याची तुम्हा आम्हा प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागलेली असते.

सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत “ आई कुठे काय करते ” ? ही मालिका चांगलीच पसंतीस खरी उतरत आहे. स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर ही मालिका प्रक्षेपित होत आहे. घरगुती विषय असला की घरचा माणूस किंव स्त्री मालिका सं’प’ल्या’शिवाय उठतच नाही.

मालिकेत अरुंधती हे पात्र फार लोकप्रिय झालेलं आहे. त्याचं सोबत तिच्या मैत्रिणीच्या भूमीकेचं पात्र निभावणारी अभिनेत्री कोण ? हे आपण आज जाणुन घेणार आहोत. कारण ते पात्र ही खूप चर्चेत आणि लोकप्रिय ठरलेलं आहे.

अरुंधतीची मैत्रीण देविकाची भूमिका साकारते राधिका देशपांडे ही अभिनेत्री. राधिकाला आपण याआधी वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलेलं आहे. तिचा अनुभव आणि अभिनय दोन्हीही खूप उत्तम आहे. तिचे चाहते ही खूप तयार झालेले आहेत. तिने आत्तापर्यंतची प्रत्येक भूमिका खूप अभ्यासू वृत्तीने साकरली आहे.

तिने संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या मालिकेत राजेंच्या बहिणीची ही भूमिका साकरली होती. त्या भूमिकेमुळे तिला जास्त रसिक ओळखू लागले. ती घराघरात जाऊन पोहचली. तिने काही मराठी चित्रपटात ही काम केलेलं आहे. व्हयानीला स्ट्रोबेरी आणि चॉकलेट, द अननोन लव्ह स्टोरी असे काही चित्रपट केलेले आहेत.

एवढचं नव्हे तर तिची स्वतःची एक अभिनय शिकवणारी स्कूल सुद्धा आहे. ज्यात ती अडमिशन स्वीकारून अभिनय शिकवते. जिचं नाव राधिका क्रिएशन असं आहे. तिला भटकंती करायला फार आवडते.

जिथं निसर्ग रमतो अश्या ठिकाणी जाऊन तिथल्या आठवणी कैद करण्यात तिला वेगळीच मजा येते. बरं एवढ्यावरच ती थांबलेली नाही. ती याही पेक्षा अजून बरच काही करते. आता ते बरच काही नेमकं काय ? तेही पाहूयात.

ती एक उत्तम लेखिका आहे. तिला वाचनाची सुद्धा फार आवड आहे. ती खूप सारे पुस्तके वाचत असते. तिने या लॉकडाऊन च्या काळात खूप पुस्तक वाचलेत असे तिने तिच्या सोशल मिडीयावर म्हंटलेले आहे. त्यासोबत लिखाण ही सतत चालू असते. अनेक वृत्तपत्रात तिच्या लेखणीतून बाहेर पडलेले शब्द नदीसारखे ज्ञानगंगा म्हणून वाहायला लागतात.

कलाकार हा फक्त एकाच कलेचा पुरस्कर्ता नसतो तर तो अनेक कलेला सोबत घेऊन जगत असतो. तसं राधिका जगते. तिला तिच्या भावी वाटचाली साठी प्रचंड शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.