बॉलिवुडमधील सिनेतारकांच्या आयुष्यातल्या अनेक उलाढाली बऱ्याच वेळा फार थक्क करून जाणाऱ्या आपल्याला पहायला मिळतात. तर मुळात अशाच एका ताऱ्याबद्दल अर्थात कलाकाराबद्दल आज आपण इथे भाष्य करणार आहोत. हा कलाकार इतर कोणी नसून चक्क रेमो डिसुझा हा प्रसिद्ध कोरीओग्राफर आहे.
हिंदी सिनेमांमधे आजवर आपल्या चांगल्या नृत्यकलेचा आविष्कार दाखवणारा हा कलाकार कशा पद्धतीने त्याच्या फार हालाखिच्या परिस्थितीमधून जाऊन आज एक मोठा स्टार झाला, हे पाहणं निश्चितच प्रेरणादायी ठरतं. रेमो डिसुझा त्याच्या यशाची एकेक पायरी हळूवार वर चढत गेला आणि आज त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी व इतर सर्व गोष्टी आहेत. तर आज आपण अशा फार गरीब परिस्थितीतून वर आलेल्या रेमोबाबत काही विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत.
2 एप्रिल रोजी कर्नाटक राज्यातील बँगलोर येथे रेमोचा जन्म झाला. त्याचं खरं नाव हे रमेश यादव असं आहे. मुंबईत आल्यानंतर या रमेशचा “रेमो” झाला. आणि त्याच्या समोरचं अवघ विश्व पा’ल’ट’लं. रेमो कुटुंबासोबत गुजरातमधे राहत होता त्यानंतर तो तिथून पळून जाऊन मुंबई या शहरात आला. आणि मुंबईतल्या लोकांना त्याने आपल्या नृत्याच्या कलाकारीने दिवाना बनवलं.
अगदी वयाच्या लहानपणीच रेमोला नृत्याचं वे’ड लागलं होतं. हे वे’डं जोपासण्यासाठी त्याने मुंबई गाठली आणि मुंबईने खऱ्या अर्थानं त्याच्या आयुष्यातल्या त्या ध्येयाचं स्वप्न साकार केलं. जो रेमो आज एक लग्झरी आयुष्य जगतो आहे तो कधीकाळी फार साधरण आयुष्य जगणारा एक तरूण होता यावर विश्वास बसतं नाही. आज रेमो अगदी कितीतरी दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवतो आहे, कारण सध्या तो सिनेसृष्टीतला एक चांगला कोरीओग्राफर म्हणून प्रसिद्ध आहे.
रेमोच्या बाबतीत सांगायच म्हटलं तर रेमोचे वडील एयर फोर्समधे कुक म्हणून काम करत असायचे. त्यावेळी घर चालवल्या जाऊ शकेल इतकी त्यांची जेमतेम कमाई होतं असायची. आणि नेमकं एका वेळी रेमोने घराला हातभार लावण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. यावेळी रेमोने अगदी सायकल दुरुस्ती करणं, रेशनच्या दुकानात कामाला जाणं, बेकरीच्या दुकानात काम करणं अशी बरीचशी मिळेलं ती कामे केली.
दुसरीकडे म्हणालं तर अंगात असलेली नृत्याची कला रेमोला शांत बसू देत नव्हती, त्याला त्याच्याशिवाय चैन प’ड’त नव्हतं. नृत्यकलेबाबतची ही बेचैनी रेमोला मुंबईकडे घेऊन आली खरी, पण मुंबईत आल्यावर हाती काम नव्हतं, जवळ पुरेसा पैसादेखील नव्हता, अशा परिस्थितीत अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर उपाशी पोटी झोपूनच घालवल्या. मुळात आयुष्याच्या या प्रचंड ध’का’ध’की’च्या काळातचं रेमोची भेट लिजेल हिच्यासोबत झाली.
तिने या क’ठी’ण प्रसंगात रेमोची साथ खं’बी’र’प’णे दिली. आणि दोघांनीही एकत्र येऊन लग्न केलं. आज या दाम्पत्याला दोन मुले आहेत. आपल्या स्ट्र’ग’ल’च्या काळात रेमो विविध नृत्याच्या कार्यक्रमांचा विजेतादेखील होतं राहिला. त्याच्या अंगातील गुण सिनेसृष्टीत ओळखले जावू लागले. यानंतर उर्मिला मातोडकर यांच्या रंगीला सिनेमात रेमोला डान्स करण्याची संधी चालून आली.
यानंतर रेमोच्या हाती पहिल्यांदा कोरीओग्राफरची भुमिका निभावण्याची वेळ येऊन ठेपली ती, दीवाना या सोनू निगम यांच्या पहिल्या अल्बमसाठी. आणि अशा रितीने रेमोने त्याच्या आयुष्यात पुढे आलेल्या हर एक आव्हानाला स्विकारतं आज सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी रेमोला हा’र्ट अॅ’टॅ’क’दे’खी’ल येऊन गेला, परंतु तो सध्या सुखरूप आहे. रेमोच्या कोरीओग्राफीचे आज जगभरात अनेक चाहते निर्माण झालेले तुम्हाला सहज पहायला मिळतील.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!