आज बॉलीवुडमधील सिनेजगतात प्रभू देवा हे नावं एखाद्या सुपरस्टारपेक्षा साहजिकचं कमी नाहीये. प्रभू देवा म्हटलं की, सर्व रसिकप्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते नृत्य, नृत्यातील उर्जा, आणि आणखी विविध गोष्टी. कारण प्रभू देवा हा इतका भन्नाट आणि जबरदस्त नृत्यकार आहे की त्याच्यासमोर अनेकजण फिके पडू शकतील.

प्रभू देवा केवळ एक डान्सर म्हणूनचं उदयास आलेला नाही तर त्याशिवाय त्याने भन्नाट अशा कोरीओग्राफींचे नमुनेही आपल्यासमोर सादर केल्याचे आजवर आपण पाहिले आहेत. भारतातला “मायकल जॅक्सन” या नावानेदेखील प्रभू देवा ओळखला जातो. प्रभू देवा हा आज एक दिग्दर्शक म्हणूनदेखील सिनेसृष्टीत परिचीत झालेला आहे. प्रभू देवा याचं खरं नाव हे “शंकुपानी” असं आहे. नुकताच 3 एप्रिल रोजी प्रभू देवाचा जन्मदिन साजरा करण्यात आला.

त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अनेक चाहत्यांनी, रसिकप्रेक्षकांनी व इतर सिनेकलाकारांनी त्याला भरभरून शुभेच्छादेखील दिल्याच्या पहायला मिळाल्या. मुळात प्रभू देवा याच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला आजवर ठाऊक नसतील परंतु त्या फारच प्रमाणात चर्चेत राहिल्या व प्रचंड गाजल्यासुद्धा आहेत.

त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे, प्रभू देवाने चक्क एका अभिनेत्रीकरता आपल्या पत्नीशी घ’ट’स्फो’ट घेतला होता. आणि या अभिनेत्रीचं नाव ऐकून तुम्हाला फारच आश्चर्याचा ध’क्का बसेल. कारण ही अभिनेत्री आज दाक्षिणात्य सिनेमांमधील प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे. आणि तिचं नाव म्हणजे, “नयनतारा”. प्रेम हे आं’ध’ळ असतं असं म्हणतात. कदाचीत प्रभू देवासारख्या एका विलक्षण कलाकार माणसाच्या आयुष्यातही प्रेमानेच थोडासा घा’त केला असं म्हणावं लागेल.

प्रभू देवा याने आपल्या पहिल्या पत्नीपासून घ’ट’स्फो’ट घेण्याचं ठरवलं ते केवळ आणि केवळ नयनतारा हिच्यावरील प्रेमापोटी. त्या काळात नयनतारा आणि प्रभू देवा हे दोघेही लिव्ह – इन रिलेशनशीपमधेदेखील राहत असल्याचे पहायला मिळाले होते. ही बाब समजताच प्रभू देवाच्या पहिल्या पत्नीने लताने को’र्टा’त याविषयी धाव घेतली होती. हे प्रकरण इतकं चि’घ’ळ’लं होतं की, दाक्षिणात्य भागातील चाहत्यांनी नयनताराला गृहीत धरत तिचे पुतळे रस्तावर जा’ळ’णं’देखील सुरू केलं होतं.

नयनताराने प्रभू देवाच्या चांगल्या संसारात फु’ट पाडली, अशी अनेकांची मानसिकता झाली होती. या मानसिकतेने नयनतारा प्रचंड घा’ब’र’ली आणि तिने नंतर पुढे चालून तिचं व प्रभू देवा यांच नातं कायमचं संपल आहे, अशी घोषणादेखील केली. परंतु तिने ही घोषणा करण्याआधीच प्रभू देवा याने तिच्याकरता लतापासून कायदेशीररित्या घ’ट’स्फो’ट घेऊन टाकला. प्रभू देवाच्या आयुष्यात यावेळी प्रचंड घालमेल झाल्याची पहायला मिळाली होती.

प्रभू देवा याने ज्या नयनतारासाठी सर्व सोडलं, त्याच नयनताराने प्रभू देवाला सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रभू देवाला पहिल्या पत्नीपासून तिन मुले होती. परंतु एकाचा कॅ’न्स’र’ने मृत्यू झाला. प्रभू देवा याला बॉलीवुडमधील झगमगाटात त्याच्या कलेसाठी जितकी प्रसिद्धी लाभली तितकीच झ’ळ त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बसलेली पहायला मिळते.

प्रभू देवाला नृत्याच्या कोरीओग्राफीचा एकप्रकारे थोडासा वारसा आधीच मिळाला होता असं म्हणता येईल, कारण त्याचे वडीलदेखील एक कोरीओग्राफरचं होते. परंतु प्रभू देवा याने कोरीओग्राफी आणि नृत्यकला यांचा दर्जा एका वेगळ्याच उच्च प्रतिवर नेऊन ठेवला यात काहीच शं’का नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!