ब्रेक-अप नंतर डेप्रेशनमधे गेलेल्या दिपिकाला रणबीर कपूरने सावरलं होतं, पहा नक्की काय घडलं होतं त्यावेळी?

बॉलीवुडमधील सिनेसृष्टीतले अनेक प्रकार आपल्या नजरेसमोरून रोज जात असलेले आपण पाहत राहतो. मुळात बऱ्याच गोष्टी अनेकदा थक्क करून जाणाऱ्या ठरतात. तर काही वेळा कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्यातले चढ-उतारदेखील आपल्यला त्यामुळे पहायला मिळतात.

अशाच प्रकारची एक गोष्ट म्हणजे, दिपिका पादुकोन या अभिनेत्रीचं झालेलं ब्रेक-अप. आणि त्याच्या परिणामांनी आलेल्या डिप्रेशनमधे गेलेल्या दिपिकाला कशा पद्धतीने रणबीर कपूर या अभिनेत्याने तिला सावरलं. दिपीका पादुकोन आणि रणबीर कपूर यांची जोडी एके काळी प्रसारमाध्यमांमधे फारच अधिक चर्चेचा विषय ठरली होती. या दोघांच्या प्रेमाने एकेकाळी एक फारच सिरियस मोड घेतल्याचा आपल्याला पहायला मिळाला होता.

रणबीर कपूर आणि दिपिका हे दोघेही त्या काळात एकमेकांसोबत लग्न करण्यापर्यंतही त्यांच नातं गेल्याच पहायला मिळालं होतं. परंतु काही कारणास्तव या दोघांची जोडी पुढे टिकू शकली नाही. ज्या काळात रणबीर दिपीकाच्या लग्नाची चर्चा रंगू लागली होती नेमक्या त्याच काळात दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते.

आणि वेगळं झाल्यानंतर जेव्हा दिपिका फारचं नर्व्हस होऊन, डिप्रेशनच्या फेजमधे गेली होती, तेव्हा खुद्द रणबीर कपूर यानेच तिला त्यामधून बाहेर यायला मदत केली होती. हे थोडसं वेगळं वाटेलं पण खरी गोष्ट हिच आहे, ज्याच्यासोबत आपलं नातं तुटलं आहे त्यानेच आपल्यला त्या दुखा:तून सावरायलाही मदत केली आहे. परंतु इथे ही गोष्ट अशाच स्वरूपात घडली. आणि त्यामुळेच आजही दिपिका रणबीर याला आपला चांगला मित्र समजते आहे.

रणबीर कपूर याच्यासोबत ब्रेक – अप झाल्यानंतर दिपिकाला ती बाब पचवणं निश्चितच थोडसं अवघड झालं होतं. दिपीका आणि रणबीर आधीपासूनच या नात्याबद्दल प्रचंड सिरियस असूनदेखील नंतर जर या नात्याला संपवावं लागत असेल तर तो त्रास साहजिकचं दिपिकाला अडचणीत टाकणारा ठरला होता. खरतरं कॅटरिना कैफ हिच्याकरता रणबीरने दिपिकाला थोडसं बाजूला केल्याचं आवजर समजतं.

दिपिकाने स्वत:च याबाबत सांगितलं होतं की, तिने रणबीरला कॅटरिनासोबत असताना रंगे हाथ पकडलं आहे. दिपिकाला तिच्या आयुष्यातल्या डिप्रेशनमधल्या फेजमधून बाहेर येण्यास रणबीर यानेच एक चांगला मित्र बनतं मदत केली असल्याचं एका मुलाखतीदरम्यान दिपिकाने कबूल केलं होतं. रणबीर दिपिका यांच नातं ब्रेक-अप झाल्यानंतरही चांगल राहिलं आहे. त्या दोघांमधे एकमेकांबद्दल काहीही वैर नाही.

दिपिकासाठी रणबीर नेहमीच एक चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा मित्र राहिला आहे. दिपीकाच्या सध्याच्या काळातील कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर ती, पठाण या सिनेमात पुढे दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात शाहरूख खान आणि जॉन अब्राहम हेदेखील असणार आहेत.

दुसरीकडे रणबीर कपूर हा ब्र’म्हा’स्त्र यामधे दिसणार आहे, ज्यात आलिया भटदेखील भुमिका साकारणार आहे. सध्या रणबीर कपूर याचं आलिया भट हिच्यासोबत रिलेशनशीप चालू आहे, तर दुसरीकडे आता दिपिका विवाहबद्ध झालेली आहे. दिपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह याने एक नवी पहाट फुलवल्याची पहायला मिळते आहे. आता सर्व चाहत्यामंडळींना आलिया व रणबीर यांच्या लग्नाची घाई झालेली पहायला मिळते आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!