गर्ल्स हॉस्टेलच्या च्या सेटवर दिवाळीची धमाल …

 

हिंदू धर्मात सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. हा सण म्हणजे वाईटाचा नाश, सत्याचा विजय व तिमिरातून तेजाकडे जाण्याचे प्रतीक आहे. दीपावलीम्हणजे दिव्यांची माळ. म्हणूनच याला दिव्यांचा उत्सव (फेस्टीवल ऑफ लाईट) असेही म्हणतात. दिवाळी जवळ आली की घराची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी, सजावट केली जाते. नवीन कपडे घेतले जातात. मराठी कुटुंबात चिवडा, लाडू, चकल्या, करंजी, शंकरपाळे असे फराळांचे पदार्थ केले जातात. घरासमोर सुंदर सुंदररांगोळ्या काढल्या जातात. संध्याकाळी पणत्या लावल्या जातात. विद्युत रोषणाईने घर उजळले जाते. सोमवार ते शुक्रवार रात्री १०.०० वा. पहायला मिळणाऱ्या झीयुवावरील गर्ल्स हॉस्टेल’ वर सुद्धा दिवाळीची धमाल अनुभवयाला मिळाली.  या मालिकेतील भयावय चित्रीकरणाच्या वातावरणातून थोडासा वेळ काढून गर्ल्स हॉस्टेलमधील ‘गर्ल्स ‘नी त्याचप्रमाणे मालिकेतील इतर पात्रांनी दिवाळीची एक रंगतदार संध्याकाळ अनुभवली. प्रियांका, तन्वी , मालती  , वल्लरी , ध्यानलक्ष्मी , सागरिका , वनिता ,  बीना ,सारा ,  दुर्गा आणि त्याच प्रमाणे  विभव ,सेतू ,  महाजन काका , इन्स्पेक्टर जाधव या सर्वानी या वेळी कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या . कोणीकंदील बनवला तर कोणी पणत्या लावल्या , कोणी रांगोळी सजवली तर कोणी गोडाचे पदार्थ बनवले आणि शेवटी सगळ्यांनी एकत्र होऊन दिवाळी सण साजरा केला.

दिवसरात्र  जागणारं आणि गर्दीनं ओसंडून वाहणारं  मुंबई शहर , महिलांसाठी अजूनही म्हणावं तसं सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत स्वतःला सिद्धकरण्यासाठी  सारा , प्रियांका , तन्वी , मालती  , वल्लरी , ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा  आणि वनिता  या पुणे , नाशिक , पंढरपूर , मराठवाडा अशा व इतरवेगवेगळ्या शहरांतून  आलेल्या  मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये  एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून , धमाल मस्ती आणि  लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेतराहत होत्या. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असतानाच होस्टेलच्या भिंतीच्या  आत मात्र त्यांना प्रचंड सुरक्षित वाटतं होतं. सावित्री गर्ल्स हॉस्टेल मधील या मुलींनासगळ्यात मोठा आधार होता  तो एकमेकींचा ,  एकमेकांबरोबर असण्याचा , आणि त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुरक्षित हक्काची जागा होती  , त्यांचे सावित्री गर्ल्सहॉस्टेल . मात्र याच त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेल च्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडायला लागल्या ज्यामुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्तीसंपून त्याची जागा  थरकाप उडवणाऱ्या भयाने  घेतली आहे .गूढ घटनांची साखळी वाढू  लागलीय आणि त्यानंतर सुरु झालंय एक अनाकलनीय प्रसंगांचं भयंकर चक्र ! या सर्व मुली एक एक करून या चक्रात गुरफूटल्या जात आहेत. प्रथम सारा आणि आता नेहा च्या अनपेक्षित जाण्याने प्रत्येकवेळी कोणीतरी आहे तिथे ही भावना बळावूलागून हॉस्टेलमध्ये एक भीतीच सावट पसरू लागलय.

झी युवा ही वाहिनी, नवोदित तरुण कलाकारांच्या अभिनय गुणांना नेहमीच वाव देते. या मालिकेत सुद्धा सर्वच नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. याकलाकारांचं छोट्या पडद्यावरचं पदार्पण असलं तरी विविध नाटकांमधील भूमिकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यातली प्रत्येक व्यकिरेखा सशक्तपणे साकारली आहे. या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. “सोमिलक्रिएशन” ची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन सचिन गोताड  यांनी केलं आहे.  “गर्ल्स हॉस्टेल ‘कोणीतरी आहे तिथे …”  ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री१०.०० वा. झी युवावरून पहायला मिळते.