जी टेलीव्हिजनवर सध्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. रश्मी देसाई ही अभिनेत्री बिग बॉस १३ मधील सध्याची कंटेस्टेंट आहे. सोशल मिडीयावर तिच्या चर्चांना सध्या उधाण आल्याच पहायला मिळतयं. टेलीविजन इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी या अभिनेत्रीने या आधीच काही चित्रपटांमधे काम केलेल आहे. रश्मी देसाई या अभिनेत्रीने याआधी हिंदी, भोजपुरी, गुजराती व आसामी अशा चित्रपटांमधे भूमिका निभावल्या आहेत.
आणि मुळात तिचं पुन्हा सोशल मीडियावर झळकण्याच कारण याच भूमिका ठरल्या आहेत. चित्रपटांच्या काही व्हिडिओजमधे रश्मी अत्यंत घायाळ व बोल्ड अदांमधे अप्रतिम सौंदर्याची खाण दिसत आहे. आणि चाहत्यांवर नेमक्या याच गोष्टीची तिने सध्या भुरळ घातली आहे; असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. तिच्या काही चाहत्यांमधे हा सुखद धक्का जरासा वेगळाच लागला म्हणावा लागेल.
आपल्या अभिनयातील कौशल्यानं रसिकप्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावणारी ही अभिनेत्री नुकतिच बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये पहायला मिळते आहे. या कार्यक्रमात ती सिद्धार्थ सोबतच्या जरा हटके अशा लव्ह हेट रिलेशनशिपमुळे चर्चेत येत राहते. यात नेमकं तिच नात कुणाशी कसयं याबाबत जरा साशंकताच बाळगली जात आहे. दरम्यान याच कार्यक्रमात तिने आपलं प्रेम हे अरहान खानवर असल्याच एकदा जाहीर केल होतं.
पण अरहान खानचे लग्न झालेले आहे आणि मुळात त्याला एक मुलही आहे. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यावर प्रतिक्रिया देताना रश्मीने आपल्या नात्याला अजून काही वेळ देणं तिला स्वत:ला गरजेचं वाटतं, अशी प्रतिक्रियादेखील दिली होती. सध्या इन्स्टाग्रामवर रश्मीचे चाहते दिन ब दिन वाढत आहेत.
झलक दिख ला जा, नच बलिये, उतरण व सोबतच दिल से दिल तक या अशा हिंदी रिएलिटी शोज व मालिकांमधेही तिने तिच्या भूमिका योग्या पद्धतीने वठवून साकारल्या आहेत. रश्मी सध्या तिच्या हाॅट आणि ग्लॅमरस अशा अदांमुळे जरी प्रकाशझोतात असली तरी याआधी तिच्या काही काॅन्ट्रवर्सीदेखील समोर आल्या आहेत.
त्यात महत्वाच्या म्हणजे तिचा व नंदीश संघ यांचा झालेला घटस्फोट अथवा रश्मीने सिद्धार्थवर केलेले काही आरोप असतील. पण सध्यातरी बिग बॉसच्या घरातील या अभिनेत्रीने केलेल्या बी ग्रेड चित्रपटांतील काही हाॅट सिन्स लीक झाल्याने रसिकांना ती पुन्हा मधाळ भासत आहे. सर्वांचे लक्ष पुन्हा तिच्या बोल्ड अंदाजाकडे खेचले गेले आहे, याबाबत तिळमात्रही शंका नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.