भारतीय समाजाने नेहमीच अनेक जुन्या रूढी आणि परंपरा झुगारून समाजाला नवीन आदर्श घालून दिलेला आहे. पृथीका यशीनी देखील याच पठडीतील एक नाव आहे. पृथीका यशीनी पहिली ट्रांसजेंडर महिला ठरली आहे, जिने पोलीस दलामध्ये स्थान मिळवले आहे. पृथीका ही पोलीस दलामध्ये भरती झालेली आहे. आज ती तामिळनाडू पोलीस दलाचा एक अविभाज्य भाग आहे.

पृथीका चा जन्म एक मुलगा म्हणून झाला होता, त्यानंतर तिचे नाव देखील प्रदीपकुमार असं ठेवण्यात आलं होतं. परंतु तिच्यातीलं जाणीवा तिला वेगळाच संकेत देत होत्या. ती मुलगा आहे हे स्वीकारणं तिला कठीण जात होतं. अशा परिस्थितीत संघर्ष करत तिने पोलीस दलामध्ये आपलं स्थान कसं प्राप्त केलं याच्याबद्दल जाणून घेऊयात.

आपल्याकडे जर कोणाला वेगळ्या जाणिवा असतील तर त्याला समाजातून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. समाज अशा व्यक्तींच्या भावना समजून घेण्यात नेहमीच कमी पडत असल्याचे आपल्याला नक्कीच जाणवेल. अशा व्यक्तींना समाजच काय पण कुटुंबीय आणी आप्तेष्ट देखील समजून घेण्यामध्ये कमी पडतात.

परंतु हेच घडलं प्रत्येकाच्या बाबतीत तिने सेक्सचेंज सर्जरी करून घेतली. या सर्जरीनंतर प्रदीपकुमारचे पृथीका मध्ये रुपांतर झाले. अशावेळी आई-वडिलांनी समजून घेनं अपेक्षित असतं परंतु तिच्या आई-वडिलांनी शरमेनं तिच्या सोबत राहणे देखील सोडून दिले.

जिथे आई-वडिलांनीच तिला सोबत दिली नाही तेथे समाज तिला काय मदत करणार? पृथीकाने जेव्हा पहिल्यांदा पोलीस बनण्यासाठी अर्ज सादर केला तेव्हा रिक्रुटमेंट बोर्डाने तो अर्ज फेटाळून लावला कारण सरळ होतं की, त्या फॉर्मच्या जेंडर कॉलममध्ये तीन ऑप्शन नव्हते.

ट्रांसजेंडर साठी कुठलीही लिखित फिजिकल परीक्षा तसंच मुलाखतीसाठी कुठल्याही अटी या फॉर्ममध्ये दिलेल्या नव्हत्या. या सगळ्या अडचणींवर मात पृथीकाने केली. तिने हार मानली नाही, न्यायालयाचा दरवाजा ठोठावत न्यायासाठी याचना केली आणि आपल्या न्यायालयाने देखील योग्य तो निकाल देत पृथीकाला न्याय मिळवून दिला.

या परीक्षेचा कट ऑफ पृथीका साठी 28.5 वरून 25 करण्यात आला. त्यानंतरच पृथीका प्रत्येक टेस्टमध्ये पास झाली आणि सर्व परीक्षा पार पडल्यानंतरच तिला तामिळनाडू पोलीस दलात भरती करण्यात आले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.