जर ॲक्शन सीन असतील तर असे चित्रपट फार गाजत असतात कारण आजकाल तरुणांना ॲक्शन असलेले पाहण्याची प्रचंड आवड आहे. काहीजणांना तर ॲक्शन सीन एवढे आवडतात की फक्त ॲक्शन सीन पाहण्यासाठी काहीजण चित्रपट पाहायला येत असतात. ॲक्शन दृश्य कशा प्रकारे चित्रीत केले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात आज या ॲक्शन सीन बद्दल.

अमीर खान : बॉलीवूड मध्ये आमीर खानच्या धूम 3 चित्रपटातील ॲक्शन सीन्सची नेहमीच चर्चा केली जाते. पण खूपच कमी जणांना माहिती आहे की हे दृश्य आमीरने नव्हे तर त्याच्या स्टंटमेनने केलेली आहेत. म्हणजे आमिर खान स्वतः खूप अवघड ॲक्शन सीन करत नाही.

सलमान खान : सलमान खानच्या ॲक्शन सीन वरती त्याचे चाहते प्रचंड फिदा असतात. सलमान खानच्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये सलमान अनेक खतरनाक स्टंट करताना दिसून येतो, पण सलमान देखील सर्व स्टंट स्वतः करत नाही. त्याच्या सारखा दिसणारा मुलगा त्याच्यासाठी हे ॲक्शन स्टंट करत असतो.

शाहरुख खान : शाहरुख खान तशी ॲक्शन सीन्स कमी देतो परंतु हल्लीच्या काही चित्रपटांमध्ये त्याने भरपूर प्रमाणात ऍक्शन सीन दिलेली आहेत. शाहरूखच्या झिरो, फॅन, चेन्नई एक्सप्रेस चित्रपटांमधील ॲक्शन सीन्स खूपच दमदार आहेत आणि त्याचे चाहते देखील त्याची नेहमीच तारीफ करत असतात, पण या चित्रपटातील ॲक्शन सीन्स शाहरुखने स्वतः केलेली नाही तर त्याच्या बॉडी डबलने शूट केलेली आहेत.

हृतिक रोशन : ऋतिक रोशन ने आजपर्यंत अनेक थरारक आणि प्रचंड अवघड असे ॲक्शन सीन्स स्वतः दिलेले आहेत. त्याच्या धूम 2, बँग बँग अशा अनेक चित्रपटातील ॲक्शन सीन्सचे प्रचंड कौतुक केले जाते. ऋतिकला स्वतःचे ॲक्शन सीन्स स्वतः करायला प्रचंड आवडतात. त्यामुळे, तो अनेक चित्रपटांसाठी बोडी डबल वापरत नाही. केवळ मोहोनजोदाडो, क्रिश या चित्रपटातील त्याचे ॲक्शन स्टंट खूपच कठीण असल्यामुळे त्याने बॉडी डबल्सचा वापर केला होता.

अक्षय कुमार : अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हटले जाते. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या स्टंट्स साठी ओळखला जातो. त्याच्या ऍक्शन दृश्यांची नेहमीच चर्चा होत असते. त्याने आजवर अनेक कठीण ॲक्शन सीन स्वतः दिलेले आहेत. अक्षय त्याचे चित्रपटातील कठीणातील कठीण स्टंट देखील स्वतः करण्याचं प्रयत्न करत असतो. केवळ चांदणी चौक टू चायना या चित्रपटासाठी त्याने बॉडी डबलचा वापर केला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.