अभिजित खांडकेकर जो सध्या माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत गुरुनाथ सुभेदार ची भूमिका निभावतो त्याने 2013 मधे त्याच्या फेसबुक फ्रेंड ‘सुखदा देशपांडे’ हिच्याशी लग्न केले. सुखदा देशपांडे हि एक उत्तम कत्थक डान्सर असून ती पुण्यातील एक कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहे.

2016 मध्ये अभिजित माझ्या नवऱ्याची बायको यामध्ये मुख्य भूमिकेत दिसला, आणि त्याची ओळख महाराष्ट्रभर झाली. झी मराठीची टॉप टीआरपी देणारी मालिका असल्याने त्याचे मानधन देखील वाढले आहे.

अनिता दाते ही माझ्या नवऱ्याची बायको मध्ये राधिका सुभेदार ची भूमिका निभावणारी अभिनेत्री. ललित कला केंद्रामध्ये “चिन्मय केळकर” सोबत अनिताची भेट झाली होती. ते एकत्र शिकत होते मात्र त्यांचं प्रेम एका नाटकादरम्यान जडलं. चिन्मयने अनिताला प्रपोज केला मात्र सध्या लग्न करायचे नाही असे दोघांनी सांगितले.

चिन्मय नंतर काय करेल काय नाही, आणि त्याला लग्नही करायचे नाहीये असे चिन्मयने सांगूनही अनिता त्याच्यासोबत दिढ-एक वर्षे एकत्र सोबत राहिली. लग्न झालं काय? नी नाही झालं काय? त्यांना काही फरक पडत नव्हता मात्र नंतर त्यांनी लग्न केलं.

अपूर्वा नेमलेकर ही झी मराठी वाहिनीवरील ‘आभास हा’ या मालिकेद्वारे अपूर्वा घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर ती ‘आराधना’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत झळकली. शिवाय “रात्रीस खेळ चाले” या मालिकेत शेवंतांच्या भूमिकेत अपूर्वाने एंट्री करून लोकांना घायाळ केलेच.

सध्यातरी अपूर्वाला सगळे शेवंता याच नावाने ओळखू लागले आहेत. युवा सेनेचा पदाधिकारी असणारा “रोहन देशपांडे” या मुलासोबत तिचे लग्न झाले आहे. आठ वर्षे रोहन आणि अपूर्वा एकमेकांना डेट करत होते व त्यानंतर त्यांनी लग्न केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.