हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलीवुडमधे अनेक गोष्टी कलाकारांच्या दैनंदिन जीवनातल्या आपल्यासमोर येत असतात. अशात एक खास बात म्हटलं तर ती म्हणजे एखाद्या कलाकाराची काही काळानंतरची चेहऱ्याची दिसणारी ठेवणं. अर्थातच वयानुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात परंतु त्यातही काही कलाकार त्यांच्या वयाच्या आणि दिसणाच्या बाततीत तजेलदार राहतात व ते अपवाद ठरतात. परंतु आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यामधे झालेला कमालीचा बदल तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोण आहेत नेमक्या या अभिनेत्र्या?
सर्वप्रथम बोलायचं म्हटलं तर ती अभिनेत्री म्हणजे अनिता राज. 80 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर तमाम हिंदी सिनेसृष्टी गाजवून सोडलेली ही अभिनेत्री. धर्मेंद्र, मिथुन, राजेश खन्ना, अनिल कपूर यांच्यासारख्या अगदी सुपरस्टार अभिनेत्यासोंबत तिने आजवर हिंदी सिनेसृष्टीत काम केलेलं पहायला मिळतं. अनिता राज आजच्या घडीला फार प्रमाणात बदलल्याची पहायला मिळते. हिंदी सिनेसृष्टीत तिचं सौंदर्य ढळू लागलं आणि तिला येणाऱ्या पहिल्यासारख्या दर्जेदार भुमिका कमी झाल्या. सध्याला अनिता हिंदी मालिकांमधे काम करताना पहायला मिळते.
अनितानंतर बोलायचं म्हटलं तर ती अभिनेत्री म्हणजे, मंदाकिनी. मंदाकिनी आज तिच्या खाजगी आयुष्यात अगदी गुंग झालेली पहायला मिळते आहे. आज वयाच्या 56 व्या वर्षाच ती हिंदी सिनेसृष्टीपासून फार दूर गेलेली आहे. 1985 सालच्या राम तेरी गंगा मैली या सिनेमातून अगदी एका रात्रीतच सुपरस्टार अभिनेत्री ठरलेल्या मंदाकिनीचं सौंदर्य आज थोडसं वेगळं असल्याच जाणवतं. मंदाकिनीच्या आयुष्यात सिनेमांवरून अनेकदा वाद झाल्याचे पहायला मिळतात. तिचं करियर फारसं वादादीतचं राहिलं, परंतु असं असलं तरी रसिकप्रेक्षकांच्या मनावर कायम तिने अधिराज्य गाजवलं यात तिळमात्र शंका नाही.
मंदाकिनी नंतर म्हटलं तर ती अभिनेत्री म्हणजे अमृता सिंह. अर्थातचं सैफ अली खान याची पहिली पत्नी. परंतु त्याव्यतिरिक्त अमृता त्या काळात तिच्या सौंदर्यावरून व अभिनयाच्या कौशल्यावरून प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध असल्याची पहायला मिळतं होती. 80 सालातल्या अगदी अव्वल अभिनेत्रींपैकी एक असं तिला मानल्या जायचं. बालीवुडमधे पदार्पण करतात तिला प्रसिद्धी लाभायला सुरूवात झाली. आज अमृता सिंह जरी बऱ्यापैकी वयस्क दिसत असली तरी ती हिंदी सिनेमात तिला शोभतील अशा भुमिका अगदी तजेलदारपणे साकारते. परंतु सध्यातरी बरेच दिवस झाले तिने सिनेमात काम नाही केलेलं दिसतं. त्या काळात सैफ अली खानचं नाही तर इतर अनेक चांगले अभिनेतेही तिच्या प्रेमात पडू शकले असते इतकं बहारदार सौंदर्य अमृताला लाभलं होतं.
पुनम ढिल्लो हे नाव तुम्ही आजवर ऐकलं आहेच. शिवाय तिच्या अदाकारीची दखलही रसिकप्रेक्षकांनी सिनेमांच्या माध्यमातून घेतल्याची पहायला मिळते. एकूण तब्बल 90 पेक्षाही अधिक सिनेमे गाजवलेली ही अभिनेत्री आज फार प्रमाणात बदलल्याची पहायला मिळते. पुनम तिच्या करियरच्या बाबतीत फारच सिरियस अभिनेत्री होती. तिने 2018 आणि 2020 सालात हिंदी मालिकांमधेही काम केल्याच पहायला मिळालं आहे. शिवाय 2019 पासून ती राजकारणातही सक्रीय झाल्याची पहायला मिळते आहे.
मिनाक्षी शेशाद्री. मिनाक्षीचा उल्लेख नेमका काय करावा हा प्रश्न सर्वप्रथम उमटतो. अगदी सौंदर्याच्या बाबतीतली खाण म्हटलं तरी अपुरचं अशी ही सोज्वळ आणि प्रचंड सुंदर अभिनेत्री. दामिनी या सिनेमानंतर मिनाक्षीने हिंदी चित्रपटांना रामराम ठोकला. आणि ती सध्या न्यू यॉर्क येथे स्थायिक झाली असल्याच समजतं.
यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे फराह नाज. तब्बू या अभिनेत्रीची मोठी बहिण असलेली फराह 80 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक गणल्या जात होती. तिने एक ना अनेक भन्नाट सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केलेलं आहे. तिने पुढे हळूहळू सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. आज ही अभिनेत्रीदेखील प्रचंड प्रमाणात बदलल्याची पहायला मिळते आहे. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!