या आहेत बॉलिवुडमधील राजकन्या, अगदी आलीशान राजेशाही घराण्यातून आलेल्या काही अभिनेत्रींची ही कहानी!

बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत अनेकदा आपण कलाकारांना त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल लक्षात ठेवतो. जिद्द, चिकाटी आणि काही हाती फारसी उमेदही नसताना या झगमगाटी दुनियेचा काही कलाकार पाठलाग करून ज्या पद्धतीने ते मिळवतात, त्या आपल्या सर्वांना निश्चितच कौतुक आणि अभिमानही वाटतो. दुसरीकडे म्हणालं तर बॉलीवुडमधीलचं घराण्यातले कलाकारांच्याच मुला मुलींचे इथे येणे फारसे अवघड नसते. तसेच एक मार्गी पाहिले तर जर कुणी राजघराण्यातील व्यक्ती असेल तर त्यांच्याकरताही सिनेमाक्षेत्रात येणं थोडीशी तडजोडीची बाब नक्कीच असते. राजघराण्यातील प्रतिष्ठा, सन्मान, एक वेगळाच आदर आणि दुसरीकडे झगमगाटाची प्रसिद्धी असलेलं पण राजघराण्याच्या वारसदारांना काहीस न पटणारं क्षेत्र म्हणता येईल. तर मुळात आज आपण अशा काही बॉलीवुडमधील अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या अगदी राजघराण्यातील असूनदेखील हिंदी सिनेसृष्टीत अभिमानाने काम करत आल्या आहेत.

जर आता सर्वप्रथम बोलायचंच म्हटलं तर तुम्हाला चांगली परिचीत असलेली अभिनेत्री अर्थात किरण राव. आमिर खान याची पत्नी असलेल्या किरण रावने हिंदी सिनेसृष्टीत आपली निर्माती म्हणून अशी खास स्वत:ची ओळख आज निर्माण केलेली आहे. इतकचं नाही तर बॉलीवुडमधे लेखिका, दिग्दर्शिका म्हणुनही तिने भुमिका बजावल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगायच म्हणजे तेलंगणा येथील वानापार्थी या राजघराण्याशी तिचे नातेसंबत आहेत. तिचा जन्म आणि तिची जडणघडण अगदी एका आलीशान अशा राजेशाही घराण्यातून झालेली आहे.

यापुढे ज्या अभिनेत्रीचं नाव घ्यायचं आहे ती म्हणजे अदिती राव हैदरी. अदितीने आजवर अनेक हिंदी सिनेमांमधुन काम केलेलं पहायला मिळतं. बॉलिवूडमधे कायम सक्रीय राहणारी आणि फशॅनचा पुरेपूर योग्य सेन्स असणारी अशी ही अभिनेत्री. अदितीदेखील एका आलीशान राजेशाही कुटुंबातून येते आणि तिचेदेखील लागेबांधे एका राजघराण्यातील आहेत. अदिती आसामच्या पुर्व राज्यपाल राहिलेल्या मोह्हमद सलेह अकबर हैदरी यांची नात आहे, अकबर हैदरी हे रामेश्वरम वानापार्थीचे राजे होते. विशेष म्हणजे, अदिती राव हैदरी आणि किरण राव यांच राजघराणं एकच आहे. किरण राव आणि अदिती यांचे बहिणीचे नातेसंबंध आहेत.

“मैनै प्यार किया” हा सिनेमा गाजवून सोडलेली अभिनेत्री म्हणजे, भाग्यश्री. भाग्यश्री एका रातोरात स्टार झालेली अभिनेत्री होती, तिच्याबद्दल सर्वांना बरचसं ठाऊकही आहे. सध्या ती बॉलीवुडपासून बऱ्यापैकी दूर राहत असल्याची पहायला मिळते. एकाच सिनेमातून थेट हिट झालेली भाग्यश्रीदेखील एका राजेशाही घराण्यातली आहे. महाराष्ट्रातील सांगलीच्या राजेशाही घराण्याशी तिचा संबंध आहे. अभिनेत्री भाग्यश्री ही श्रीमंत राजा विजय सिंह राव माधवराव पटवर्धन यांची मुलगी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु भाग्यश्रीचं पुर्ण मुळ नाव हे श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन असं आहे. भाग्यश्रीने हिमालय दासनी याच्यासोबत लग्न केलेलं आहे.

यापुढे ज्या एका अभिनेत्रीचं नाव येतं ती म्हणजे, सोनल चौहान. बॉलीवुडमधे जन्नत गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोनल तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फार सक्रिय असल्याची पहायला मिळते. इमरान हाश्मी याच्यासोबत जन्नत या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाच्या करियरची सुरूवात केल्याची पहायला मिळाली होती. उत्तर प्रदेशातील राजपूत घराण्याशी सोनलचा संबंध आहे. मैनपुरी जिल्ह्यात तिचं कुटुंब स्थित आहे. सोनल तिचा राजेशाही थाट जरासा बाजूला ठेवत हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची खुबी आणि कला दाखवायला सज्ज असल्याची पहायला मिळते.

यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे सोहा अली खान. सोहाबद्दल बऱ्याच गोष्टी अनेकांना माहित आहेतच. कारण शाही राजघराणं असलेल्या पटौदी कुटुंबाबात आज प्रत्येकाला माहिती आहे. भोपाळचे नवाब असलेले मंसुर अली खान पटौदी हे एक क्रिकेटपटू होते जे की बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान आणि सोहा अली खान यांचे वडील आहेत. नवाब कुटुंब आजही अगदी भन्नाट राजेशाही थाट असलेलं कुटुंब आहे. आणि या राजघराण्यातील आलीशान बाबींचा सहसा अंदाज लावणं कठीणचं. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!