आज मराठी मधील एका गोड आवाजाच्या प्रसिद्ध गायिकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. याचा आनंद तिच्या घरासोबत साऱ्या चाहत्यांना ही झालेला आहे. कोरोना काळात एकतर नकारात्मकता खूप पसरली होती पण आता आनंदाची बातमी कळल्यामुळे चाहत्यांना आनंद होत आहे.

तर ती गायिका कोण हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता लागलेली असेल तर चला जाणून घेऊ. तिचं नाव आहे श्रेया घोषाळ. ओळखलं ना. अहो किती तिचे गाणे आपण ऐकत असू.

आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेया घोषालने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. श्रेयाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावरूनच श्रेयाने ती गरोदर असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तिने तिच्या हटके व्हर्च्युअल डोहाळे जेवणाचे फोटो देखील शेअर केले होते. आज दुपारी श्रेयाने मुलाला जन्म दिला आहे.

श्रेयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. “आज दुपारी देवाने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान मुलगा दिला आहे. अशा प्रकारची भावना या आधी कधीच अनुभवली नव्हती. शिलादित्य, मी आणि आमचं कुटुंब आनंदात आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद.” अशा आशयाची पोस्ट शेअर करत श्रेयाने आई झाल्याचा आनंद व्यक्त केलाय.

श्रेया घोषालच्या या पोस्टवर तिला अनेक सेलिब्रिटींनी तसचं चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरून श्रेयाने फोटो शेअर करत गरोदर असल्याची माहिती दिली होती. याचवेळी तिने बाळाचं नाव देखील ठरवलं होतं. ”बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे. शीलादित्या आणि मला ही बातमी तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होतोय.

आम्ही आयुष्यातील नव्या आध्यायाची सुरूवात करत आहोत. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम याची आम्हाला गरज आहे” असं कॅप्शन देते श्रेयाने तिचा बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला होता. यात तिने बाळाचं नाव श्रेयादित्य ठेवणार असल्याचं म्हंटलं होतं.

अनेक वर्षांच्या अफेअरनंतर श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. श्रेयाचा पती मुंबईतील एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहे.बंगाली पद्धतीने श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं.श्रेया अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आई होणं ही जगातील सर्वांत आनंदाची गोष्ट असते. त्याच्या नंतर आणि आधी कदाचित काहीच नसेल. त्यामुळे श्रेया खूप नशीबवान म्हणावी लागेल. तिच्या या आई होण्याच्या प्रवासाचं खूप अभिनंदन आणि भावी वाटचाली करीता स्टार मराठी कडून शुभेच्छा.