तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेने आजवर केवळ रेकॉर्डचं प्रस्थापित नाही केले तर या मालिकेने अनेकांची स्वप्ने साकार केली. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षक केवळ हसलाच नाही तर इतरही अनेक चांगल्या गोष्टी या मालिकेच्या माध्यमातून घडलेल्या पहायला मिळाल्या. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेने कायमच आपल्या देशाला एकजूटीने बांधून ठेवणाऱ्या विविधतेतील एकतेची जाणीव कायम मनात तेवत ठेवली.

खरतरं तारक मेहता का उलटा चश्मा या या मालिकेच्या अनेक चांगल्या पैलूबद्दल बोलायचं ठरवलं तर कदाचित शब्दच अपुरे पडतील. तर मुळात आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या पात्राने या मालिकेला आजवर चार चांद लावून ठेवले आहेत. दिशा वकानी अर्थात या मालिकेतील दयाबेन ही अभिनेत्री. या अभिनेत्रीला आज खरतरं तमाम भारत दयाबेन या नावानेच अधिक प्रमाणात ओळखतो आहे. दिशा वकानी हे नाव फार क्वचित लोकांना ठाऊक असेल परंतु तमाम रसिकप्रेक्षकांच्या मनात दयाबेन हे नाव कायम कोरलेलं राहिल, यात तिळमात्र शंका नाही.

आज दिशा वकानीपेक्षाही तिच्या कामाची भुमिका अधिक लक्षात राहते याचं कारण आणि श्रेयदेखील अर्थात अभिनेत्री दिशालाच जातं. तिने ज्या पद्धतीने या पात्राचे अनेक पैलू उलगडून दाखवले ते क्वचितच इतर एखाद्या अभिनेत्रीला साकारता आले असते.

दिशाने तिच्या हरएक बारकाईवर काम करत दयाबेन ज्या बखुबीपणे रसिकप्रेक्षकांसमोर मांडली त्याला खरचं तोड नाही, असं म्हणावं लागेल. दिशा वकानीच्या बाबतीत हल्ली रसिकप्रेक्षकांच्या मनात फार कुतूहल निर्माण झाल्याचं पहायला मिळतं आहे. याला खास कारणही तसचं आहे. दिशा वकानी 2017 या सालापासून तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत पहायला मिळाली नाहीये, आणि ही बाब चाहत्यांसाठी फार गंभीर स्वरूपाची झाली आहे.

2017 सालात जेव्हा दिशाने ही मालिका काही दिवसांकरता सोडली होती तेव्हा ती मॅटर्निटी रजेवर गेल्याचं कारण समजलं होतं. परंतु तिची मॅटर्निटी रजा इतकी प्रचंड कालावधीसाठी वाढेल याची रसिकप्रेक्षकांना अजिबात कल्पनाच नव्हती. आता तब्बल गेल्या दोन वर्षांपासून ती या मालिकेत पहायला मिळत नाहीये. तिच्या नसण्याने मालिकेच्या चाहत्यावर्गावर कमालीचा फरक पडलेला जाणवतो. अलीकडेच कोईमोईच्या प्लॅटफॉर्मवरून दिशाने एक मुलाखत दिल्याची पहायला मिळाली.

या मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या पगाराच्या किस्स्याबाबत एक खुलासा केला. दिशाने गुजराती रंगभूमीवरून आपल्या कलाकृतीची सुरूवात केली होती. कॉलेजजीवण जगत असताना दिशाने व्यावसायिक नाटकाला सुरूवात केल्याची पहायला मिळते. या नाटकातील भुमिकेसाठी तिला त्यावेळी 250 रूपये इतका पगार मिळतं असायचा. तिचा पहिला पगार आणि त्याची गोड आठवण आजही तिच्या मनात चांगल्याच पद्धतीने साठवून ठेवलेली पहायला मिळते. दिशाने हे पैसे तिच्या वडीलांजवळ दिले होते.

तिच्या वडीलांनी या पैशांना त्या काळात फ्रेम करून आजही ते जपून ठेवल्याचे पहायला मिळते. दिशाने कोईमोईला दिलेल्या मुलाखतीनंतर तिच्या तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत पुन्हा परत येण्याच्या चर्चांनी चांगलाच घाट घातला असल्याचा सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे.

निर्माते व दिशा वकानी यांच्यामधे काही कारणास्तव वा’द निर्माण झाल्याने दिशा नक्की कधीपर्यंत या मालिकेत पुन्हा पहायला मिळेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पण काही म्हटलं तरी दिशा वकानी हिला तिच्या खऱ्या नावापेक्षा दयाबेन या नावाने आणि त्या पात्रनेच एक अभुतपूर्व ओळख मिळवून दिली आहे, याच तिळमात्र शंका नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!