मित्रांनो!, आजकाल तुम्ही सोशल मीडियावर किती अन कसे दिसता यावरून तुमचं अस्तित्व अवलंबून असते. नवीन डिझायनर साडी ते मालदीवच्या एखादया रिसॉर्टमधला अर्धनग्न फोटो असो, सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ट्रोल होतच असतात. मग ते मराठी असो किंवा हिंदी सेलिब्रिटी असो. साराअली खानचा एक बॅकलेस फोटो सध्या फार चर्चेत आहे. त्या फोटोचे कौतुक देखील होत आहे आणि टीका ही होत आहे. प्रियांका चोप्रा तर सतत कपड्यांवरून ट्रोल होत असते. रणवीर सिंग हा अभिनेता चित्रविचित्र कपड्यांच्या स्टाईल साठीच ओळखला जातो.

मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी हा तुमच्या चांगलाच स्मरणात असेल. त्याच्या वास्तववादी अभिनयाने जसा तो रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहतो तशाच प्रकारे तो आता त्याच्या अतरंगी लुकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी स्वप्नीलने असाच एक फाटका तुटका ड्रेस घालून लांबलचक पोस्ट टाकली होती त्यालाही लोक प्रचंड हसले होते. “म्हातारीचा झगा घालून कुठे फिरतोस?” अशा कमेंट्स आल्या होत्या.

तर अशा या स्वस्तातला ‘रणवीर सिंग’ म्हणून नवीनच ओळख प्राप्त झालेल्या स्वप्नीलचा अतरंगी लुक बघाच. चला हवा येऊ द्या मध्ये सध्या हसण्यासाठी जज म्हणून घेतलेल्या स्वप्नील जोशीला त्याच्या स्टाईल वरून सोशल मीडियावर अनेक कंमेंट्स मधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. चला बघूया काही मजेशीर कंमेंट्स.

“छान आहे बेडशीट!👌 दादर वरुन घेतलंय का?”
“ओ जोशी मांडववालेsss!”
“सावधान!, टेलर शिकत आहे.”
“सेक्सी नाही भाऊ ते मॅक्सि दिसतंय ”
“रणवीर चावला का काय याला? ”
“बायकोचा गाऊन वापरणं शोभते का तुला? ”
“ओ जोशी, तुमाला टेलरनं फशिवलं”
“आता फक्त डोक्यावरून पदर घेतला की झालं”
“ओटी भरून घ्या सर”
“अशाने तालिबानी पळवून नेतील”
“गाडीचं कव्हर अंगावर घेऊन कुठं हिंडतोस?”
“भिकारी” पिक्चरचा ड्रेस आजूनबी अंगावर तसाच ठेवलाय का?”
“लॉजवर धाड पडली का काय?”
“मधल्या झोळीत कांगारूवानी लेकरू ठिवा सर”

असो… कमेंट्स वाचून खूप हसलो राव!!! असल्या एकेक जवळपास १००० च्या वर अतरंगी कमेंट्स पडल्या आहेत. नैतिकता आणि मर्यादेमुळे काही अर्वाच्य, अश्लील कमेंट्सचा उल्लेख टाळला आहे. परंतु काय भयानक बोलतात हो ट्रोलर्स… बापरे!

मित्रांनो!, मध्यंतरी कंपूशाही वरून जसे बॉलीवूड ला ट्रोल केले जात आहे तसेच मराठी इंडस्ट्रीला सुद्धा टार्गेट केले जात आहे. एकीकडे त्या ड्रेस वरून ट्रोल होत असताना काहींनी हेअर स्टाईल आणि दाढी वरून आपापली मते व्यक्त करत आहेत. ट्रोल करणारे जसे असतात तसे काही चाहते काळजीपोटी काही सूचना देखील करत असतात.

कोरोनामुळे पिपिई किट सर्वाना परिचयाचे झाले आहे त्यामुळे स्वप्नीलच्या या ड्रेसची तुलना किटशी केली जात आहे. म्हातारीच्या झग्यासारखा हा पोशाख आहे असेदेखील ट्रोलर्स बोलत आहेत. ट्रोलर्स सेलिब्रेटींच्या स्टाईल ला कोणत्या गोष्टीशी तुलना करतील सांगू शकत नाही. काही सेलिब्रिटी त्या कंमेंट्स तितक्याच गमतीने घेतात, मात्र काही सेलिब्रिटी त्यांच्या भाषेत ट्रोलर्सना सुनावतात देखील.