मित्रांनो, सुपरहिट कॉमेडी ‘वेलकम’ हा धमाल चित्रपट पहिला नाही, असा माणूस सापडणे मुश्किल. नाना पाटेकर, अनिल कपूर, अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि घुंगरू शेठच्या भूमिकेतील अविस्मरणीय असा परेश रावल. मित्रांनो!, याच घुंगरू शेठच्या बायकोचा म्हणजे अक्षयच्या मामीचा धमाल रोल करणारी ही अभिनेत्री आठवतेय का..?, आता तिला ओळखणंही झालंय कठीण.

जिस देश में गंगा रहता है, वेलकम या चित्रपटात झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना. या अभिनेत्रीचे नाव आहे सुप्रिया कर्णिक. मराठमोळ्या असलेल्या सुप्रियाचा मुंबईत जन्म झाला. १९९६ सालच्या तिसरा डोळा या मराठी मालिकेत ती अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकल्या होत्या. या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय ती अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटात झळकली आहे.

अभिनेत्री सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाची मोठी झाली.आई वडील आणि दोन मोठ्या बहिणी असे त्यांचे छोटंसे कुटुंब. लहानपणापासूनच ती खूप डॅशिंग होती. दोघी बहिणी मोठ्या असल्या तरी कुणी त्यांची छेड काढली तर सुप्रिया त्यांच्या मदतीला धावून जायची त्यामुळे सुरुवातीपासूनच सुप्रिया टॉम बॉय म्हणून ओळखली जायची.

दहावी नंतर सुप्रियाने मुलांचे ट्युशन घेतले, दुकानात काम केले, टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही काम केले. एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अशी सर्व कामे केली. पुढे सौदी अरेबियाला काही वर्षे बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले. मात्र तेथील कामला कंटाळून ती पुन्हा भारतात परतली.

पुन्हा मालिकां मध्ये काम करण्याची इच्छा झाली आणि काम मिळाले. शांती, वो रेहनेवाली मेहलों की, कानून, तेहकीकात अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे. तर बेवफा, राजा हिंदुस्थानी, यादे, जोडी नंबर १, ताल, जिस देश मी गंगा रहता है, वेलकम बॅक अशा जवळपास ५०हून अधिक हिंदी चित्रपटात ती दिसली आहे. लेक लाडकी या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

सुप्रिया कर्णिक आजही सिंगल आहे. ती दोन वेळा प्रेमात पडली मात्र दोन्ही वेळेला तिची फसवणूकच झाली. या फसवणुकीमुळे मी त्यांना चोप देऊन लोळवले देखील होते असे ती सांगते. त्यानंतर लग्नाचा विषय देखील बाजूला गेला. आज सुप्रिया अभिनयापासून थोडी दुरावली असून काही वर्षांपासून ती अध्यात्माकडे वळली आहे. अनेक तरुण तरुणींना ती अध्यात्माचे धडे देखील देताना पहायला मिळते.